दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन होऊन पाच महिन्याचा कालावधी लोटला आहे. सिद्धार्थच्या निधनाने त्याची मैत्रीण शहनाज गिल पूर्णपणे खचली होती. मात्र आता ती स्वतःला या परिस्थितीतून सावरत आहे. त्याचबरोबर ती आता आपल्या कामालाही सुरुवात करत आहे. ‘बिग बॉस १३’ पासूनच चाहते शहनाजच्या अदाकारीने आणि खोडकरपणाचे दिवाणे आहेत.
याच अंदाजात शहनाजचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधून चाहत्यांना पूर्वीची शहनाज पाहायला मिळत आहे. संगीतकार यशराज मुखाटेनी हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून सर्वांचं हसू येत आहे. यशराज आणि शहनाजच्या जुगलबंदीचा हा मजेशीर व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतोय.
यशराजने हा व्हिडिओ इंस्टाग्राम रिल्सवर पोस्ट केला आहे. या नवीन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, यशराजने शहनाजच्या ‘बिग बॉस १३’ च्या जुन्या क्लिपमध्ये संगीताचा तडका मारून एक मजेदार व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये यशराज ढोलक आणि गिटार वाजवताना दिसत आहे. तर शहनाज, “सच्च बोरिंग डे, सच्च बोरिंग पीपल” असे म्हणत आहे. पुढे जेव्हा शहनाज म्हणते की, “माझ्याशी कोणीही बोलत नाही, कोणीही माझ्यावर प्रेम करत नाही.” तेव्हा तिची सह-स्पर्धक आरती सिंग उत्तर देत तिला म्हणते की, “तू मला बोर करत आहे, मी बाहेर जात आहे.”
यशराजने या संवादाला संगीताचा तडका दिलेला आहे. या व्हिडिओमध्ये यश स्वतः गाणे गाताना दिसत आहे, यासोबतच शहनाज आणि यशराज या व्हिडिओमध्ये डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना यशराजने कॅप्शनमध्ये लिहिले की, “बोरिंग डे, अमेझिंग शहनाज, लव्ह यूर एक्सप्रेशन.”
या व्हिडीओवर चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण आपली मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये कॉमेडियन तन्मय भट्टने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने असे लिहिले आहे की, “अर्चना पूरण सिंग अगोदरच हसली आहे म्हणून मला वाटते की माझी गरज नाही.” याच्या व्यतिरिक्त संगीत कलाकार शोभित बनवैतने लिहिले की, “लॉकडाउनमध्ये बाहेर जाऊन मरू देखील करू शकत नाही.” आता हे पाहणे महत्वाचे असेल की, हा व्हिडिओ अजून किती कमाल करेल.
महत्वाच्या बातम्या
जावेद अख्तर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; नेताजींच्या पुतळ्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करत म्हणाले…
“हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या? फ्लॉवर नहीं फायर है”
YouTube Shorts मधून कमवा महिन्याला ७.५ लाख रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम
RRB Group D च्या विद्यार्थ्यांसोबत सरकारने रातोरात काय फसवणूक केली? जाणून घ्या का पेटलाय वाद..