Share

मंजुळेंवर टिका केल्याने मोदीसमर्थक लेखिकेला लोकांनी झापले, म्हणाले तुम्ही मुर्ख आहात हे पुन्हा पुन्हा..

लोकप्रिय लेखिका आणि शेफाली वैद्य त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपुर्वी त्यांनी सोनाली कुलकर्णीवर टिका केली होती त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा त्या चर्चेत आल्या आणि यावेळी त्यांनी नागराज मंजुळे यांना टार्गेट केलं आहे.

सध्या नागराज मंजुळे त्यांच्या झुंड या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकताच हा चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी चित्रपटगृहात गर्दी केली आहे. पण शेफाली वैद्य यांनी याच चित्रपटावरून नागराज मंजुळे यांना घेरलं आहे. त्यांनी थेट नागराज मंजुळे यांच्यावर टीका केल्याने सोशल मिडीयावर त्या ट्रोल होत आहेत.

आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की नागराज मंजुळे आपल्या चित्रपटात नेहमी अशा कलाकारांना घेत असतात जे सामान्य असतात किंवा दुर्लक्षित असतात. पण यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांना चित्रपटात घेतले आहे. त्यावरूनच शेफाली वैद्य यांनी नागराज मंजुळे यांच्यावर निशाणा साधला.

त्यांनी फेसबूकला पोस्ट करत प्रश्न उपस्थित केला आहे. त्या म्हटल्या आहेत की, इतका राग होता उच्चवर्णिय प्रस्थापितांवर तर मग मुख्य भुमिकेत अमिताभ कशाला? त्यांच्या या पोस्टनंतर त्यांच्यावर टीकेचे झोड उठू लागले आहेत. अनेक लोकांनी शेफाली वैद्य यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.

एकाने कमेंट केली आहे की, तुम्ही मुर्ख आहात हे पुन्हा पुन्हा अधोरेखित करू नका. तर एकाने कमेंट केली आहे की, तुम्ही स्वत:च पोस्ट करून सिनेमाला प्रसिद्धी देत आहात. अशा अनेक कमेंट्स त्यांच्या पोस्टवर येत आहेत. नागराज मंजुळे यांचे चाहते शेफाली वैद्य यांच्यावर संतापले आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, सर्वांनी कशावरही बोलूच नये असं एखादं कलम घटनेत लिहायला विसरले. त्यासंदर्भात नवीन कायदा पारित करायला हवा.

अशा अनेक कमेंट्स त्यांच्या पोस्टवर येत आहेत. दरम्यान, नागराज मंजुळे यांचा झुंड या चित्रपटाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत होते. नागराज मंजुळे यांचा झुंड हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासमवेत आकाश ठोसर, रिंकू राजगुरू अशा अनेक कलाकारांनी मुख्य भुमिका साकारली आहे. तसेच अजय अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.

https://www.facebook.com/582727795/posts/10161845340407796/?d=n

महत्वाच्या बातम्या
‘इतका राग होता उच्चवर्णिय प्रस्थापितांवर तर मग मुख्य भुमिकेत अमिताभ कशाला?’ लेखिकेची जहरी टीका
आपल्याच आईसोबत पतीचे लग्न लावायला निघाली होती ‘ही’ अभिनेत्री, वयाच्या अंतराबद्दल म्हणाली..
लग्नानंतर 12 दिवसांतच शिबानी दांडेकरने इंस्टाग्रामवरून हटवले Mrs. akhtar, फोटोसुद्धा बदलला

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now