Share

भाजपचा केंद्रीय मंत्री राहीलेला ‘हा’ अभिनेता तृणमूलकडून खासदारकीच्या रणांगणात उतरणार; ममतांची घोषणा

बंगालमधील आसनसोल लोकसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत प्रसिद्ध सिनेस्टार आणि भाजपचे माजी नेते शत्रुघ्न सिन्हा हे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार असणार आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, जे नुकतेच भाजप सोडून तृणमूलमध्ये सामील झाले आहेत, ते कोलकाताच्या बालीगंगे विधानसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार असणार आहे. (shatrughan sinha in loksabha election)

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी या दोन्ही नेत्यांना या जागांवर उमेदवारी देण्याची घोषणा केली.आसनसोल संसदीय जागा आणि बंगालच्या बालीगंगे विधानसभा जागेसाठी १२ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे, तर १६ एप्रिल रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शनिवारी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. गेल्या वर्षी बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आसनसोल लोकसभा मतदारसंघातून राजीनामा दिला होता. आता त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत ममता यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे.

https://twitter.com/mamataofficial/status/1502898363339276288?s=24

आसनसोल लोकसभा मतदारसंघातून बाबुल सुप्रियो हे २०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोन वेळा भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. २०१९ मध्ये बाबुल सुप्रियो यांनी तृणमुलचे उमेदवार मूनमून सेन यांचा १,९७,६३७ मतांनी पराभव केला होता.

गेल्या वर्षी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्याचवेळी केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकल्यानंतर बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी खासदारकीचाही राजीनामा दिला होता.

ममता यांनी रविवारी ट्विट केले की, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे आसनसोलमधून लोकसभा पोटनिवडणुकीत आमचे उमेदवार असतील. तसेच माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध गायक श्री बाबुल सुप्रियो हे बल्लीगंगे विधानसभा पोटनिवडणुकीत आमचे उमेदवार असतील. जय हिंद, जय बांगला.

महत्वाच्या बातम्या-
बाप आहे की कसाई? बायकोवरती आलेल्या रागातून एक वर्षाच्या मुलीला जिवंत खड्ड्यात पूरलं
आम आदमी पक्षामुळे नेमके कोणाचे नुकसान? गोपीनाथ मुंडेंनी आधीच दिलं होतं ‘हे’ उत्तर
…तर राज्यातील माजी मंत्र्यांची सुरक्षा काढा, रोहित पवारांची गृहमंत्र्यांकडे मागणी

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now