‘शिवसैनिकांची अवस्था भिकाऱ्यासारखी, बाहेरच्यांना गुलाबजाम अन् आम्हाला डाळभात पण नाही’

शिवसेना आता चांगलीच गोत्यात आली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड.. तर दुसरीकडे पक्षातील नेत्यांनी बोलून दाखवलेली मनातील खदखद. सर्व बाजूंनी आता शिवसेनेची चांगलीच कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. या सर्व घडामोडींमुळे सध्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या चांगलेच चिंतेत आहेत.

राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असून शिवसेना समर्थक आणि शिंदे समर्थक हे रस्त्यावर उतरत आहेत. सध्या राज्यात आंदोलने मोठ्या प्रमाणत सुरू आहेत. राज्यात शिवसेनेच्या (Shiv Sena) समर्थनार्थ मेळावे आयोजित केले जात आहेत.

याचबरोबर शिवसेनेच्या (Shiv Sena) समर्थनार्थ मेळाव्यात शिवसेना शक्तीप्रदर्शन देखील करीत आहे. तसेच आज चाकण येथे झालेल्या मेळाव्यात नेत्यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे. माजी आमदार शरद सोनवणे (Sharad Sonawane) यांनी पक्षश्रेष्ठींवर टीका करत पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.

यावेळी बोलताना सोनवणे यांनी म्हंटलं आहे की, “सेनेला फक्त समर्थन देऊन चालणार नाही तर, आमच्या मनातल्या अडचणींही आता त्यांना ऐकाव्या लागतील. तीन वर्षात शिवसैनिकांची पाठराखण झाली नसल्याने शिवसैनिकांची अवस्था भिकाऱ्यासारखी झाली आहे.’

पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही तुमचे आहोत, मात्र बाहेरच्यांना गुलाबजामून आणि आम्हाला डाळभात पण नाही. ‘मातोश्री’चे दरवाजे पदाधिकाऱ्यांसाठी उघडे केले तर हाच पदाधिकारी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही,’ असं सोनवणे यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, ‘आम्हाला शिवसेनेचा त्रास नाही, पण राष्ट्रवादीसमोर आम्हाला लढावं लागतं, या आमच्या भावना ‘मातोश्री’नी ऐकाव्यात,’ असं आवाहन देखील सोनवणे यांनी यावेळी बोलताना केलं. सध्या राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे. एकीकडे शिंदे यांनी केलेलं बंड तर दुसरीकडे शिवसेनेतील नाराजीमुळे राजकारण तापलं आहे.

महत्वाच्या बातम्या
‘साहेब तुम्ही विजयी व्हावेत!,’ मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचा एकनाथ शिदेंना जाहीर पाठिंबा
लग्नानंतर दोन महीन्यातच आलिया भट आणि रणबीर कपूर बनणार आईवडील, गुड न्युज शेअर करत म्हणाले…..
शिवसैनिक आणि बंडखोर आमदाराच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची