अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. सध्या ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. अनेकांनी तिच्यावर संताप व्यक्त केला आहे. (sharad ponkshe shocking statement on ketki chitale)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतलं होतं. अजूनही केतकी पोलिसांच्याच ताब्यात आहे. तिच्यावर राजकाणातूनच नाही, तर मनोरंजन क्षेत्रातूनही टीका केली जात आहे. पण केतकी मात्र तिच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
मी पोस्ट डिलीट करणार नाही, असे केतकीने म्हटले होते. केतकीच्या या वागणूकीवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनीही केतकी चितळे प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची ही प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे.
शरद पोंक्षे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. त्यांनी विनायक दामोदर सावरकर, नथुराम गोडसेंसारख्या भूमिका साकारलेल्या आहे. त्यामुळे अनेकदा ते वादात अडकले आहे. त्यामुळे ते याप्रकरणावर काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते, आता त्यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
मी केतकीची फेसबूक पोस्ट वाचली. तिने शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह आणि त्यांच्या शारीरीक व्यंगावर भाष्य करणारा मजकूर शेअर केला आहे. तिने शेअर केलेली कविता ही अन्य कुणाची आहे. केतकीने जे केलं आहे ते चुकीचंच आहे, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे.
तसेच ती असं म्हणते की मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तर ते खरं आहे. पण त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन मर्यादा ओलांडणे हे योग्य नाही. सोशल मीडियावर ऍक्टीव्ह असताना आपण हा विचार केलाच पाहिजे की आपण शेअर करत आहोत किंवा स्वत: पोस्ट करत आहोत ते योग्य आहे की नाही? असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे.
तसेच केतकी अजून खुप तरुण आहे, तिच्यासमोर तिचं अजून अख्खं आयुष्य आहे. त्यामुळे तिला तिच्या चुकीची जाणीव करुन दिली पाहिजे. केतकीने काही फार मोठा गुन्हा केलेला नाही. तिला सुधरण्याची संधी दिली तर तिचं भविष्य आणि करीअर भटकणार नाही, असेही शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
५० हजारांची पुस्तके घेणाऱ्या राज ठाकरेंच्या एका फोनवर राज्यातली ग्रंथालये सुरू झाली होती; वाचा किस्सा..
आम्ही ३ मंदिरे मागितली होती, तुम्ही दिली नाही, आता.., ज्ञानवापीवर भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
सोनूसाठी सोनू आला धावून, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केले ‘हे’ कौतुकास्पद काम, म्हणाला…