Share

“शिंदे साहेब म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही, फक्त स्वत:ची काळजी घ्यायची अन् बरे व्हायचं”

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. (sharad ponkshe share eknath shinde incident)

सध्या सर्व आमदार आसामच्या गुवाहटीमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याभरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच शिवसैनिक आमदारांच्या बंडामुळे आक्रमक झाले आहे. अशात काही कलाकारही या राजकीय घडामोडींवर ट्विट करताना दिसून येत आहे.

आता अभिनेते शरद पोंक्षे यांच्या एका पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. या पोस्टमध्ये शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे. शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर खुप सक्रीय असतात. तसेच अनेकदा ते राजकीय नेत्यांवर आणि घडामोडींवर भाष्यही करत असतात.

https://twitter.com/ponkshes/status/1540323068991549441?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1540323068991549441%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fmarathi-cinema%2Factor-sharad-ponkshe-shared-thanks-giving-post-to-eknath-shinde-a597%2F

आता शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट केली आहे. कर्करोगाशी लढताना मोठ्या भावासारखे मा. शिंदेसाहेब माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले, असे कॅप्शन शरद पोंक्षे यांनी शेअर केलेल्या ट्विटला दिले आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटोही पोस्ट केला आहे.

हॉस्पिटमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा फोन आला. म्हणाले, तुम्ही बिल भरायचे नाही. फक्त स्वत:ची काळजी घ्यायची आणि बरं व्हायचं. सख्ख्या भावासारखे ते माझ्यासोबत उभे राहिले, असेही शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे. सध्या शरद पोंक्षे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

दरम्यान, आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसैनिक चांगलेच तापले आहे. शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलन करत आहे. सध्या राज्यात दोन गट पडलेले आहे. त्यामध्ये काही लोक हे एकनाथ शिंदे यांच्याकडून बोलत आहे. तर काही लोक हे उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ बोलत आहे.

महत्वाच्या बातम्या-
गद्दारांना पक्षात परत घेणार नाही, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; बंडखोरांना धडकी
कोरोनाकाळात एकनाथ शिंदे घरी बसून राहिले नाहीत, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
आपल्याला हसवून कपिल शर्माने कमावले आहेत करोडो रुपये, वर्षाला भरतो ‘एवढ्या’ कोटींचा टॅक्स

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now