Share

शरद पवारांनी आतापर्यंत ५ वेळा माफी मागितली असती; राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या युपीतील खासदाराचे वक्तव्य

sharad pawar

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी अयोध्येत न येण्याचा इशारा दिला आहे. यामुळे सध्या राज ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अयोध्या दौऱ्याबाबत भाष्य केलं.

५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्यानंतर राजकारण चांगलेच रंगलेलं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे राज यांनी अयोध्या दौऱ्याबाबत केलेल्या घोषणेनंतर मनसैनिक तयारीला लागले आहेत. उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना एक गर्भित इशारा दिला.

‘राज साहेब अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली. तसेच माफी न मागितल्यास उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली. तर आता ब्रिजभूषण सिंह यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कौतुक केले आहे.

यावेळी ब्रिजभूषण सिंह यांनी एक आठवण सांगितली. ते म्हणाले, ‘सुप्रिया सुळे या संसदेत बाकावर आमच्यासाठी खायला पदार्थ घेऊन येतात. तर, शरद पवार हे मोठ्या मनाचा माणूस आहेत. पवारांनी आत्तापर्यंत 5 वेळा माफी मागितली असती, असे म्हणत सिंह यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्ष खोचक टोलाही लगावला.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. त्यामुळे, 2008 पासून मी राज ठाकरेंचा विरोध करतो. मी मराठी लोकांच्या किंवा महाराष्ट्राच्या विरोधात नसून केवळ एका व्यक्तीच्या विरोधात आहे. त्यामुळे, राज ठाकरेंना उत्तर प्रदेशची माफी मागावी, असं सिंह यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, दुसरीकडे एका भाजप खासदाराने राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे भाजपात दोन गट पडलेले पाहायला मिळत आहे. एकीकडे विरोध असताना मात्र दुसरीकडे भाजप खासदाराने पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

राज ठाकरेंच्या अयोद्या दौऱ्याचं स्वागत भाजपचे खासदार लल्लू सिंह यांनी केलं आहे. जो कुणी श्री रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत येईल त्याचं स्वागत आहे. हनुमानजींच्या कृपेने जर कुणी अयोध्येत श्री रामाच्या चरणी येत असेल तर त्याचं स्वागतच आहे, असं त्यांनी म्हंटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पुणेकरांनो सावधान! पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने खळबळ; वाचा नेमकं घडलं काय?
हेमा मालिनीला सोडून शबाना आजमीसोबत रोमँटिक अंदाजात दिसले धर्मेंद्र, वाचा काय आहे प्रकरण
मानुषी छिल्लरने पहिल्याच चित्रपटात घेतले तब्बल ‘एवढे’ कोटी, संजूबाबानेही केली मोठी कमाई
पुण्यातील रूबी हाॅल रूग्णालयात किडणी रॅकेट; मुख्य डाॅक्टर परवेझ ग्रांटसह १५ जणांवर गुन्हा दाखल

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now