sharad pawar talking about indian marriege | भाजप-शिंदे सरकारच्या धोरणांवरुन विरोधी पक्षातील नेते त्यांच्यावर टीका करताना दिसून येत असतात. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारच्या आर्थिक धोरणावरुन टीका केली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा शुभारंभाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सामान्य माणसापुढे महागाईचे संकट उभे आहे. बेरोजगारी दूर करण्यासंदर्भात धोरण आणि निर्णय घेण्यास राज्यकर्ते तयार नाहीत. सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे सामान्य माणसाच्या डोक्यावर महागाईचं ओझं वाढत आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
सध्या देशात बेरोजगारीचं संकट आहे. लोकांना काम करण्याची संधी दिली जात नाहीये. तरुणांकडे नोकरी नसल्याने त्यांना मुलीही दिल्या जात नाहीये. देशातील बेरोजगारीचा परिमाण मुलांच्या लग्न थांबवण्यावर झाला आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
तसेच दोन जातींमध्ये आणि दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण केला जात आहे. लोकांचं लक्ष अन्य ठिकाणी वळवलं जात आहे. त्यासाठी कधी जातीचा तर कधीचा धर्माचा वापर केला जात आहे, असेही शरद पवारांनी म्हटले आहे.
तसेच या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली आहे. महापुरुषांनी भीक मागितली असं एका नेत्याने म्हटलं आहे. पण महाराष्ट्रातील माणूस कधीही भीक मागत नाही. महाराष्ट्रातील माणूस मोठ्या हिंमतीने कष्ट करुन संकटावर मात करत असतो, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
तसेच देशात खुप महागाई आहे. या महागाईत ढकलून देण्याचे काम राज्यकर्ते करत आहे. या सरकारच्या आर्थिक धोरणामुळेच सामान्य माणसाच्या डोक्यावर महागाईचं ओझं आहे, असेही शरद पवारांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
वेड चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून जेनेलिया भावूक, म्हणाली, टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही..
पहिल्या उडणाऱ्या बाईकचे बुकींग सुरू, मुंबई ते लोणावळा ३० मिनिटांत; वाचा किंमत आणि फिचर्स
शाहरूखचा मुलगा आयर्नने पटलली बाॅलीवूडमधील सर्वात बोल्ड आयटम गर्ल; दोघांचे ‘ते’ फोटो झाले लीक