गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे सध्या हे आसाममध्ये तळ ठोकून आहेत. (sharad pawar shocking statement on mahavikas aghadi)
एकनाथ शिंदे यांच्या या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस आमदारांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळे नक्की पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमध्ये शिवसेनेचे एक तृतीयांश आमदार गेले आहेत. एवढं होऊनही शिवसेनेची साथ काँग्रसने आणि राष्ट्रवादीने सोडलेली नाही. महाविकास आघाडी सरकार असेपर्यंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेपर्यंत शिवसेनेची साथ सोडणार नाही असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.
आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवारांनी बैठक घेतली. त्या बैठकीत असे अनेक प्रसंग येत असतात याचे दाखले शरद पवारांनी दिले आहे. उद्धव ठाकरे जोपर्यंत राजीनामा देत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये राहणार, असेही शरद पवारांनी म्हटले आहे.
तसेच यावेळेस बंडखोरांना किंमत मोजावी लागेल, असा इशाराही यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांना शरद पवारांनी दिला आहे. तसेच या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांनाही पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली होती, पण त्यावेळी ते हात जोडून निघून गेले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वर्षा निवासस्थान सोडले आहे. यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. पण शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत, असे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
विधानसभेच्या प्रांगणात याल तेव्हा इथे आसामचे नेते येणार नाहीत; पवारांची बंडखोरांना थेट धमकी
ईडी-आयकरपासून वाचण्यासाठी शिवसेना आमदार-खासदार शिंदेंच्या गटात, धक्कादायक माहिती आली समोर
बंडखोरांना किंमत मोजावी लागेल; शरद पवारांचा शिवसेना आमदारांना इशारा






