देहूत संत तुकारामांचे दर्शन घेताच शरद पवार म्हणाले; ‘मी तसा देव धर्माला मानत नाही, पण…

Sharad Pawar: राजकारणातील चाणक्या म्हणून ओळखले जाणारे नेते म्हणजे शरद पवार होय. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजकारण एक वेगळाच दरारा आहे. शरद पवार यांनी नुकताच देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरात पाऊल ठेवून दर्शन घेतल आहे. तसेच त्यांनी एक वक्तव्य केला आहे. यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तब्बल २४ वर्षांच्या कालावधीनंतर देहूत आले होते. ते म्हणाले की, गेल्या ४०० वर्षांच्या काळात समाजात बदल घडवण्याचं काम जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी केला आहे. तुकाराम महाराज यांनी समाजाला योग्य दिशा देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे कोणाचेही नाव घेण्याचं कारण नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात संत तुकाराम महाराजांचा इतिहास दूरचित्रवाणीद्वारे पोहोचला जाणार आहे, अशी स्पष्ट माहिती पवार यांनी दिली.

शरद पवार यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजांच्या जीवनकार्यातील प्रसंगचित्रण यावर आधारित दिनदर्शिका अनावरण सोहळा दे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पवार म्हणाले, देव धर्म यापासून मी बाजूला असतो. पण माझ्या अंतकरणात काहीच ठिकाण आहेत. ती म्हणजे देहू आणि शेवगाव यांसारखी काही ठिकाण आहेत.

देहू आणि शेगाव येथील मंदिरात गेल्यानंतर मला मानसिक समाधान मिळतं. देहूला गेल्याशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही. जगद्गुरूंची सेवा करणे खूप गरजेचं आहे, असे शरद पवार म्हणाले. यावेळी अनेक वारकरी मंडळी तिथे उपस्थित होते. प्रतिभा पवारही उपस्थित होत्या. यावेळी देहू संस्थान कडून तुकोबांची मूर्ती, पगडी आणि पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय नेते मंडळी प्रतिक्रिया देत आहेत. शरद पवार २४ वर्षानंतर देहूला दर्शन घेण्यासाठी गेले आहे. मग २४ वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांची समाधी नव्हती का? तेव्हा तुकाराम महाराज नव्हते का ? असे म्हणत भाजप नेते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.

यादरम्यान काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नास्तिक असल्याचे म्हटले होते. तसेच ते कुठल्याही मंदिरात देव दर्शनासाठी जात नाहीत असा टोला लगावला होता. यानंतर राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला गेला.

महत्वाच्या बातम्या
७७ वर्षांच्या आजोबांनी फक्त दूध अन्‌ केळी खात सायकलवर गाठली कन्याकुमारी  
वारं फिरलं! कॉंग्रेस राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले ४५ नेते पुन्हा घरवापसी करणार; अजितदादांचा गौप्यस्फ
‘शरद पवार गो बॅक’! पवारांच्या बालेकिल्ल्यातच शेतकऱ्यांनी दिला नारा; का चिडलाय बळीराजा? वाचा..