राज्यात सध्या शिंदे-भाजप असे नवीन सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. शिंदे गटाला आमदार, नगरसेवक पाठिंबा देताना दिसून येत आहे. अशात शिंदे गटाचे प्रवक्त्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेच्या फुटण्यामागे राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात असल्याचे म्हटले होते. (sharad pawar on shivsen devidetion)
आता शरद पवार सध्या नागपूर दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची पुढील राजकीय भूमिका सांगितली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीसोबत लढणार? हे स्पष्ट केलं आहे. तसेच केसरकरांच्या आरोपांवरही भाष्य केलं आहे.
शिवसेना फुटीमागे पवारांचा हात आहे. बाळासाहेब हयात असताना त्यांना यातना का दिल्या, हे शरद पवार यांनी सांगावे, असे आवाहन केसरकर यांनी शरद पवारांना केले होते. त्यानंतर शरद पवारांनी आता केसरकरांच्या त्या आरोपावरही प्रतिक्रिया दिली आहे.
याला खुप महत्व द्यावं असं हे वक्तव्य नाही, असे म्हणत शरद पवारांनी केसरकरांच्या आरोपांना एका वाक्यात उत्तर दिलं आहे. तसेच निवडणूकीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढले तर लोकांना त्यांच्या मनासारखे मतदान करता येईल, असं मला वाटतं, पण त्यासाठी बैठका घ्याव्या लागतील.
शरद पवारांनी यावेळी शिंदे सरकारवर टीका केली आहे. पूर परिस्थितीत प्रशासन ठप्प असल्याचे दिसत आहे. दोघंच जण राज्यातील परिस्थिती बघत आहे, हे नुकसानदायक आहे. राज्यातील बांठीया आयोगाचा अहवाल आला आहे. पण त्यात काय आहे हे माहित नाही, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
यावेळी शरद पवारांनी केंद्रावरही टीका केली आहे. सभागृहात मागणी मान्य झाली नाही, तर लोक सभात्याग करतात. मग बाहेर महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी जाऊन शांतपणे निदर्शने करतात, शांतपणे आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार काढून घेतला आहे. उद्या यावर आम्ही चर्चा करु आणि हा प्रश्न कसा उचलायचा ते ठरवू, असेही शरद पवारांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
शिवसेना फुटीमागे पवारांचा हात म्हणणाऱ्या केसरकरांना पवारांनी दिलं एका वाक्यात उत्तर; म्हणाले…
हीच ती वेळ! जनता अजूनही आपल्याकडंच आशेनं पाहतेय; आदित्य ठाकरेंच सूचक ट्विट व्हायरल
गौतम अदानी बनले जगातले चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती, बिल गेट्सनाही टाकले मागे






