बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे आणि बाकीचे आमदार आता भाजपसोबत जाणार अशी चिन्हे दिसत आहेत. काही वेळापुर्वीच एकनाथ शिंदेंचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये ते आमदारांशी चर्चा करताना दिसत आहेत. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, भाजपचा त्यांना पाठिंबा आहे.
हे सगळं झाल्यानंतर शरद पवारांची पत्रकार परिषदेला सुरूवात झाली. यावेळी शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आणि पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. शरद पवार यावेळी म्हणाले की, अडीच वर्षे महाविकास आघाडीने उत्तम काम केले आणि अनेक महत्वाचे निर्णय घेतले.
कोरोनाच्या राष्ट्रीय संकटावर मात करण्याचं कामही केलं. हे सगळं पाहिल्यानंतर हा प्रयोग फसला असं म्हणणं राजकीय अज्ञान आहे. ज्या पद्धतीने शिवसेना आमदारांना गुवाहाटीत नेलं त्याची वस्तुस्थिती तेच आल्यावर सांगतील. इथे आल्यावर आपण सेनेसोबत आहोत हे ही सांगतील.
बहुमत शिवसेनेसोबत आहे हे सिद्ध होईल. सरकार मायनॉरिटीत आहे की नाही हे विधानसभा ठरवेल. विधानसभेत जेव्हा बहुमत सिद्ध करावं लागेल तेव्हा सर्व कळेल. तेव्हा इथे आसामचे नेते येणार नाहीत. अशी स्थिती मी अनेकदा पाहिली आहे. त्यातून मात करत हे सरकार बहुमत सिद्ध करेल. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार चालू आहे हे पुर्ण देशाला कळेल.
अजित पवारांनी महाराष्ट्रातील मुंबईची परिस्थिती पाहून भाजप या बंडामागे नसल्याचे म्हटले असेल. अजित पवारांना स्थानिक माहिती आहे. परंतु गुजरात आणि आसामची स्थिती आम्हाला जास्त आहे. एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. माझ्याकडे सर्व पक्षांची यादी आहे.
सुरत आणि आसामला जी व्यवस्था करणारे लोक आहेत ते अजित पवारांच्या परिचयाचे आहेत असं वाटत नाही. पण ते माझ्या परिचयाचे आहेत. जसं की, सुरतला भाजपचे राज्य अध्यक्ष पाटील मराठी गृहस्थ आहेत. ते पार्लमेंटरी मेंबर आहेत. त्यांचा सहभाग असेल तर अर्थ काय सांगायचा? आसाममध्ये व्यवस्था करण्यात राज्य सरकार ऍक्टीव्ह आहे, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
ईडी-आयकरपासून वाचण्यासाठी शिवसेना आमदार-खासदार शिंदेंच्या गटात, धक्कादायक माहिती आली समोर
बंडखोरांना किंमत मोजावी लागेल; शरद पवारांचा शिवसेना आमदारांना इशारा
एकनाथ शिंदेनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय केला जाहीर; म्हणाले, तिथं काही कमी पडणार नाही..
अपक्षांची मतं गृहीत धरली जाणार नाहीत, कारण…” विधानसभा उपाध्यक्षांच्या दाव्याने खळबळ






