कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याप्रकरणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साक्ष नोंदवली आहे. शरद पवारांना याप्रकरणी तिसरं समन्स प्राप्त झालं होतं. त्याची सुनावणी आज मुंबईत पार पडली आहे. (sharad pawar on koregao bheema case)
याप्रकरणी साक्ष नोंदवण्यासाठी शरद पवार सह्याद्री रेस्टहाऊसमध्ये दाखल झाले होते. निवृत्त न्यायमूर्ती जे एन पटेल आणि आयोगाचे सदस्य सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेखाली पवारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. यामध्ये शरद पवारांनी काही खुलासेही केले आहे.
या सुनावणी दरम्यान, शरद पवारांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या हवाल्याने प्रश्न विचारण्यात आले होते. त्या सर्वप्रश्नांचे शरद पवारांनी उत्तर दिले आहे. शरद पवारांनी खालील प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी उत्तरे दिले आहे.
एखाद्या व्यक्तव्यानंतर दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होते. तसेच तेव्हा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं, त्यावेळी त्याची जबाबदारी कोणाची असते ? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले आहे.
लोकप्रतिनिधींनी जाहीर वक्तव्य करताना जबाबदारीने वागलं पाहिजे. त्यांच्या वक्तव्यात प्रशोभक जेणेकरून समाजातील विविध स्तरावर त्याचे पडसाद उमटू नये. तसेच जातीय तेढ निर्माण होऊ नये.पण तसं जर काही झालं तर त्याची जबाबदारी ज्या नेत्याने वक्तव्य केलं आहे, त्याचीच असेल.
कुठल्याही पक्षाला सभेसाठी जागा देताना काय गोष्टी ध्यान्यात ठेवायला हव्यात? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले, सभांना जागा देताना लोकांना काही त्रास होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. जेणेकरुन सभेनंतर तिथे कोणताही तणाव निर्माण झाल्यास पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल.
तसेच एल्गार परिषदेत तुम्ही काय बोलले, की माझे प्रेस स्टेटमेंट असण्याची शक्यता आहे? असाही प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, एल्गार परिषदेत जे हजर नव्हते, त्यांच्यावर केस झाली हे योग्य नाही, हे विधान मी केलेलं आहे. मी एल्गार बद्दल बोललो होतो.
गंभीर गुन्ह्याची माहिती पोलिस गोळा करत असतात. तेव्हा पोलिस अधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे माहिती मिळाली की कारवाई करावी की माहिती वरिष्ठांना सांगून त्यांच्या सूचनांची वाट पाहावी? असा प्रश्न शरद पवारांना वकीलांनी विचारला होता. शरद पवार उत्तर देताना म्हणाले, महाराष्ट्र पोलिस मॅन्युअल मध्ये अशी परिस्थिती झाली. पोलिस दलाला थेट कारवाई करण्याचे मार्गदर्शन तत्व दिले आहे. त्याआधारे त्यांनी कारवाई करावी.
तसेच कोरेगाव-भीमा दंगली झाल्या. त्यावेळी त्यांना डिस्टर्ब केलं ते लोक जबाबदार आहेत. पोलिस व्यतिरिक्त याला कोण जबाबदार आहे? त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, पोलिसांना ही जबाबदारी टाळता येणार नाही.कायदा सुव्यवस्था राखणे आणि समाज विघातक कारवाया करणाऱ्यांवर कारवाई करणे पोलिसांची जबाबदारी आहे.
तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तुमचं घर हे केंद्रस्थानी होतं का? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, मी केवळ कोरेगाव भीमासाठी आलोय. मी त्यावेळी फक्त १६ वर्षांचा होतो, त्यामुळे इतकं जुनं मला काही आठवत नाही.
प्रकाश आंबेडकर यांनी बंड पुकारला, त्याचे तीव्र पडसाद उमटले, नुकसान झाले याची जबाबदारी कोणाची आहे? शरद पवारांनी याचे उत्तर देताना म्हटले की, मला याबाबत काही बोलायचे नाही. इतर कोणी काय भूमिका घेतली, कार्यक्रम घेतले, त्याचे काय परीणाम झाले. यात जायची मला आवश्यकता वाटत नाही.
तसेच जबाब नोंदवायला देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर,उद्धव ठाकरे, रामदास आठवले यांना आयोगाने पुढे आणले पाहिजे का? या प्रश्नाचे उत्तर देताना शरद पवार म्हणाले, आयोग या निष्कर्ष पर्यंत आले असावे की ही या लोकांना बोलवावे की नाही हे त्यांनीच ठरवावे.
महत्वाच्या बातम्या-
हनुमान चालिसा पठण करतच रवी राणा जेलमधून बाहेर; म्हणाले, न्यायालयाच्या…
मराठा क्रांती मोर्चाने गुणरत्न सदावर्तेंना हिसका दाखवलाच! पुण्यात पोलिस ठाण्याबाहेर प्रचंड राडा
मनसेत फाटाफूट! संजय राऊतांच्या उपस्थितीत पुण्यातील मनसेचा ‘हा’ बडा नेता करणार शिवसेनेत प्रवेश