ऊस हे आळशी माणसाचे पीक आहे, कारण…; शरद पवारांनी ऊस उत्पादकांबाबत केलं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सहकार क्षेत्रात मोठे योगदान मानले जाते. तसेच त्यांना शेतीची आवड असून त्याच्याबद्दल त्यांना माहितीही आहे. ते अनेकदा वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य करताना दिसून येत असतात. पण आता त्यांनी राज्यातील शेतीच्या पीकावर भाष्य केलं आहे. (sharad pawar on cane farming)

राज्यात अतिरिक्त ऊसाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तब्बल ९० लाख टनाहून अधिक ऊसाचे गाळप शिल्लक आहे. असे असताना शरद पवार यांनी अतिरिक्त उसाचा प्रश्न कशामुळे निर्माण झाला याचे उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी ऊस उत्पादकांना एक सल्लाही दिला आहे.

ऊस हे आळशी माणसाचे पीक आहे. म्हणजे एकदा लागण झाली की अधिकचे कष्ट नाही की हाताला मशागत नाही. लागवडीपासून, सिंचन, मशागत आणि तोडणी देखील यंत्रणेच्या साहाय्याने होते. त्यामुळे ऊस हे आळशी माणसाचे पीक आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

तसेच दराचा विचार न करता उत्पादन घेण्यास सोपे असल्याने शेतकऱ्यांचा कल याकडे वाढत आहे. शेतकऱ्यांनी ऊस घेण्यापेक्षा हंगामी पिकांसह फळबागांची लाडवड करावी, असा सल्ला शरद पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला आहे. शरद पवारांचे हे वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

तसेच वर्षानूवर्षे राज्यात ऊसाचे क्षेत्र वाढत चालले आहे. शेतकऱ्यांसाठी ऊस हा उत्तम पर्याय असला तरी उत्पन्न वाढीच्या दृष्टीने देखील प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पादन घ्यावे, त्याचबरोबर सोयाबीनचाही पेरा करावा, खरिपातील कापूसही लावावा,असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांनी फळबाग क्षेत्र वाढवण्यावरही भर द्यायला पाहिजे. फक्त ऊस म्हटल्यावर नुकसानीचे ठरणार आहे. हंगामी पिकांकडे दुर्लक्ष होत असून लागवड की वर्षभराने तोडणी अशा पिकावरच शेतकऱ्यांचे लक्ष आहे, पण त्यामुळे जमिनीचा पोत आणि दर्जावरही परीणाम होत आहे, असेही शरद पवारांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
दिनेश कार्तिकच्या त्सुनामीमध्ये वाहून गेला बांगलादेशी गोलंदाज, 6 चेंडूत केल्या 28 धावा
रिस्क है तो इश्क है! ‘या’ पेनी स्टॉकने दिला जबरदस्त परतावा, १ लाखाचे झाले थेट १६ कोटी
प्रशासनाने चार-चार वर्षे फाईली दाबून ठेवल्या नसत्या तर कोळशाचा तुटवडा नसता पडला, गडकरी स्पष्टच बोलले