Share

हा विषय आता इथेच संपवावा; शरद पवारांनी ब्राम्हण महासंघाला स्पष्टच सांगितलं

राज्यात सध्या वेगवेगळ्या मुद्यावरुन राजकारण सुरु आहे. राष्ट्रवादीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीयवादाचा आरोप केला होता. हा वाद सुरु असतानाच आता या जातीयवादाच्या वादात आणखी वाढ होताना दिसून येत आहे. (sharad pawar on bramhan mahasangh)

ब्राम्हण महासंघाने राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या भेटीचे आमंत्रण स्विकारले नव्हते असे म्हटले जात होते. ब्राम्हण संघाने शरद पवारांची भेट टाळली अशी चर्चा होती. पण त्यानंतर आता ब्राम्हण महासंघाने शरद पवारांची भेट घेतली आहे. तसेच या भेटीत नक्की काय झालं हेही शरद पवारांनी सांगितले आहे. ब्राम्हण संघटनांनी यावेळी तीन मागण्या केल्या होत्या. या मागण्यांवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ब्राम्हण समाजाबद्दल वादग्रस्त विधाने केली होती. ती विधाने त्यांनी करु नये, अशी मागणी महासंघाने केली आहे. याबद्दल शरद पवारांनी त्यांना सांगितले की, पक्षांतर्गत त्या विधानांविषयी चर्चा झाली असून अशा पद्धतीने पुन्हा कोणत्याही जाति-धर्मावर न बोलता धोरणात्मक कार्यक्रमावर बोलण्याचा अधिकार आहे असा निर्णय झाला. त्यामुळे भेटीसाठी आलेल्या सर्व मंडळींनी हा विषय इथेच संपवावा.

तसेच अलिकडच्या काळात ग्रामीण भागातील ब्राह्मण समाजाचा वर्ग हा नागरी भागात जास्त येतोय. त्यामुळे नोकरीमध्ये संधी मिळवण्यासाठी आरक्षण मिळावे ही त्यांची दुसरी मागणी होती. मात्र साधारणत: महाराष्ट्रातील आणि केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार अशा नागरी भागातील नोकऱ्यांचे लोकसंख्येतील प्रमाण पाहता मला स्वत:ला याठिकाणी आरक्षणाचे सूत्र बसेल असे वाटत नाही, असे शरद पवारांनी त्यांना सांगितले आहे.

बैठकीत ब्राम्हण महासंघाने आरक्षण कोणालाच देऊ नका अशी तिसरी मागणी केली होती. त्यावर शरद पवारा म्हणाले, असे करता येणार नाही. देशातील दलित, आदिवासी, ओबीसी या घटकाला आरक्षण हे द्यावेच लागेल. हा वर्ग शैक्षणिक आणि प्रगतीसंदर्भात मागे राहिलेला आहे. त्यामुळे इतर समाजाच्या स्तरापर्यंत हा वर्ग येईपर्यंत आरक्षणाची अशी चर्चा करता येणार नाही व आरक्षणाला तुम्ही विरोध करू नये.

विविध समाजांना विकासाला अथवा व्यवसायाला मदत करण्यासाठी विविध महामंडळे आहेत. तशा प्रकारचे महामंडळ ब्राह्मण समाजासाठी स्थापन व्हावे अशी तिसरी मागणीही ब्राम्हण महासंघाने केली होती त्यावरही शरद पवार आणि संघटांमध्ये चर्चा झाली आहे.

त्याला परशुराम हे नाव सुचवण्यात आले आहे. मात्र हा प्रश्न माझ्या संबंधात नसून राज्य सरकारशी निगडीत आहे. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना याची माहिती देऊन, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे बैठकीसाठी वेळ मागू, असे मी सर्वांना आश्वस्त केले, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘संभाजीराजे.. पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली?,’ भाजपचा संतप्त सवाल
‘संभाजीराजे.. लाथ मारा त्या खासदारकीला,’ निलेश राणेंनी स्पष्टच सांगितलं
‘शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर या,’ संभाजीराजे छत्रपतींना उद्धव ठाकरेंनी धाडला निरोप, पक्षप्रवेश निश्चित?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now