महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश करताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी भाजपला धक्का देत नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अशात शरद पवार भाजपला पुन्हा एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे, असे म्हटले जात आहे. (sharad pawar meet prabhakar kore)
शरद पवार हे कर्नाटकच्या बेळगावात गेले होते. महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावाद कायम असताना पवार बेळगावात गेले होते. पवार बेळगावला गेल्यामुळे भाजपची चिंता आणखी वाढल्याचे दिसून येत आहे. कारण भाजपचा माजी खासदार आता राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शरद पवारांनी कित्तूर या गावाला भेट दिली आहे. त्यांनी राणी चेन्नामा यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. राणी चेन्नाम्मा यांनी ब्रिटीशांविरोधात संघर्ष केला होता. चेन्नाम्मा यांच्या त्यागामुळे पुढच्या पिढ्यांना विशेष म्हणजे महिलांना प्रेरणा मिळेल, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
शरद पवार यांना स्मारकाच्या अनावरणासाठी भाजपचे माजी खासदार प्रभाकर कोरेंनी आमंत्रित केले होते. कोरे हे लिंगायत समाजाचे मोठे नेते आहे. त्यांनीच शरद पवारांना आमंत्रित केलं म्हणून भाजपची चिंता वाढली आहे. तसेच आता ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशीही चर्चा रंगली आहे.
भाजपचे माजी खासदार प्रभाकर कोरे हे राज्यसभेचे खासदार होते. शरद पवार हे देखील राज्यसभेचे सदस्य आहे. त्यामुळे त्यांच्या दोघांचे जुने संबंध आहे. असे असले तरी त्यांच्या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेकांनी तर कोरे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी शक्यताही वर्तवली आहे.
प्रभाकर कोरे यांचे लिंगायत समाजावर चांगले वर्चस्व आहे. त्यामुळे याचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांचे देशभरातील राजकीय नेत्यांशी चांगले संबंध आहे. त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ कोणी काढू नये, असे उमेश पाटील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत’; भाजपने शरद पवारांच्या ‘त्या’ भाषणाचा व्हिडिओ केला ट्विट
जेव्हा मी कुठं परदेशात जातो तेव्हा.., नॉर्थ vs साऊथच्या वादावर रणवीर सिंहने सोडले मौन
यासिन मलिकने गुन्हा कबूल केल्यानंतर अग्रिहोत्रींनी शशी थरूर-ट्विंकल खन्नावर साधला निशाणा, म्हणाले..