महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासुन भाजप नेते सरकारवर कोणत्या ना कोणत्या कारणावरुन टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या या टीकांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. मुंबईतील सिद्धार्थनगर गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकांच्या बांधकामाचे शुभारंभ करताना ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. ‘काही घटक हे नाराज होतील. आरोप करत बसतील. त्याकडे फार लक्ष देऊ नका. लोकांच्या कामाला गती द्या, धाडसाने निर्णय घ्या आणि कामाला सुरुवात करा’ असा कानमंत्र शरद पवार यांनी नेत्यांना दिला आहे.
त्याचबरोबर, “ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात असे उपक्रम घेण्याचे शक्य आहे तिथे नक्की हे उपक्रम घ्या, टीका करणाऱ्यांकडे लक्ष देऊन नका, धाडसाने निर्णय घ्या आणि कामाला सुरुवात करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्राची जनता तुमच्या पाठीमागे उभी राहिल” असे पवार म्हटले आहेत.
कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हा़ड यांचे कौतुक करत म्हटले की, ‘घर या लहान गोष्टी नाही, निवास हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बीडीडी चाळीचा विषय मुंबईसाठी महत्त्वाचा होता. त्याचे अनेक वेळा भूमिपूजन झाले. पण निर्णय काही झाली नव्हता. जितेंद्र आव्हाड यांनी जबाबदारी हातात घेतली आणि मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन घेऊन काम आता मार्गी लागले आहे.
तसेच पोलिसांच्या राहण्याच्या सोयीवर भाष्य करताना, “आपले रक्षण करणारा पोलीस कर्मचारी हा राज्याचा मुख्य घटक आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा घराचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे. राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांचे क्वार्टर हे चांगले नाही. पोलीस कर्मचारी १६-१६ तास काम करतात पण त्यांना चांगला निवारा नाही.
त्यामुळे पोलिसांनी हक्काचे घर मिळाले पाहिजे. सरकारने आपल्या रक्षकांसाठी चांगले घरं निर्माण करण्यासाठी काम हाती घेतले पाहिजे” असे शरद पवारांनी नेत्यांना सांगितले आहे. दरम्यान गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते.
या प्रकल्पाच्या माध्यमातुन म्हाडाच्या जमिनीवरील ६७२ मूळ गाळेधारकांच्या प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यातुन या गाळेधारकांना पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून ६५० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
‘हम झुकेंगे नही, डरेंगे नही, हम लडेंगे और जितेंगे’; अटकेनंतर नवाब मलिकांनी फोडली डरकाळी
नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला लावणार, किरीट सोमय्यांचा इशारा
आजोबा जोमात पोलिस कोमात! ७० वर्षीय शेतकऱ्याने गोठ्याशेजारी केली गांजाची लागवड, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नवाब मलिक खरंच भंगारवाले होते का? भंगारवाले होते तर त्यांची राजकारणात एन्ट्री कशी झाली?