मध्यंतरी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत, “२०१९ ला साताऱ्यात पावसात भिजून सुद्धा तुम्हाला ५४ च्या वर जाता आलं नाही” अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. “शरद पवार हे जरी साताऱ्यातील प्रचारसभेत पावसात भिजले असले तरी न्यूमोनिया मात्र भाजपाला झाला” असा टोला तपासे यांनी पडळकरांना लगावला आहे.
यावेळी पडळकरांवर टीका करत, “साताऱ्यातील पावसाळी सभेत शरद पवारांनी आव्हान केले आणि त्याला महाराष्ट्रातल्या तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे गोपीचंद पडळकर विसरले असावेत. शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय गोपीचंद पडळकर यांना प्रसिद्धी मिळत नाही हे कळून चुकले आहे. म्हणूनच वारंवार शरद पवारांचे नाव घेऊन कुठेतरी प्रसिद्धी मिळविण्याची धडपड आहे” असे तपासे यांनी म्हणले आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “जनता भाजपासोबत असल्यामुळे तुम्ही किती जरी संघर्ष केला, आम्ही काहीतरी मोठे आहोत असं वातावरण तयार केलं तरी २०१९ ला साताऱ्यात पावसात भिजून सुद्धा तुम्हाला ५४ च्या वर जाता आलं नाही,” अशी जोरदार टीका पडळकरांनी राष्ट्रवादीवर केली होती.
तसेच “राष्ट्रवादीची ५४ ची संख्या कायम ठेवण्यासाठी त्यांना वारंवार त्यांच्याच आमदारांना विश्वास द्यावा लागतोय. तुम्ही घाबरु नका, काळजी करु नका असं सांगावं लागतंय. पण तुमच्या हातातच काही नाही. कारण त्यांना त्यांची ५४ ची संख्या कमी होऊ नये याची काळजी असल्याने वारंवार सांगावं लागतंय की भाजपाला मी येऊ देणार नाही,” असा टोला पडळकरांनी लगावला होता.
यासोबतच, “शरद पवार हे ज्येष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत. काही जरी केलं तरी मीच केलं, कोणी माझ्या पुढे जाऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. पण देवेंद्र फडणवीस असे १०-२० पवार खिशात घालून फिरतात. त्यांच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व फडणवीसांचं आहे,” असे देखील
पडळकरांनी म्हणले होते.
त्यांच्या याच टीकांना आता राष्ट्रवादीने सडेतोड उत्तर दिले आहे. सध्या अनेक राजकिय मुद्द्यांवरून भाजप आणि महाविकास आघाडीतील वातावरण तापले आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने दोन्ही पक्ष एकमेकांवर टीकाटिप्पणी करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
“शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही हे गोपीचंद पडळकरांना कळून चुकलं आहे”
अमेरिकेच्या धमकीला झूगारून भारताने रशियाकडून घेतले २० लाख तेलाचे बॅरल; स्वस्तात झाला सौदा
..तेव्हा वडिलांच्या पायांच्या मागे आम्ही लपून बसलो होतो, पाहिल्यानंतर अभिनेत्रीने सांगितल्या भयाण आठवणी
काश्मीर फाईल्सची रेकॉर्डब्रेक कामगिरी, आमिर खानच्या दंगलला मागे टाकत बाहुबली २ ला दिली टक्कर