राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तसेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच त्यांचा यामध्ये सहभाग असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. यावरुन भाजप नेते महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करताना दिसून येत आहे. (sharad pawar criticize chandrakant patil)
अशात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चार महिने जेलमध्ये राहणाऱ्या नवाब मलिक यांचा राजीनामा घ्या. देश तोडू पाहणाऱ्या डी गँगशी त्यांचे संबंध आहे, असे आरोपपत्रात दाखल करण्यात आलेले आहे. आता तरी राजीनामा घ्या, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
आता चंद्रकांत पाटलांच्या या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी शरद पवारांनी नवाब मलिकांचे जोरदार समर्थन केलं आहे. नवाब मलिक चुकीच्या लोकांसोबत संबंध ठेवतील यावर माझा यत्किंचितही विश्वास नाही, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
शरद पवारांनी ब्राम्हण संघटनांसोबत चर्चा केली. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिकांवर बोलताना पवार म्हणाले, मत नमूद केलं आहे, हा निर्णय नाही. फायनल डिसिजन येईल तेव्हा बोलू. माझी खात्री आहे. ते चुकीचे नाही. मलिकांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो.
तसेच नबाव मलिक चुकीच्या लोकांसोबत संबंध ठेवतील याच्यावर माझा यत्किंचितही विश्वास नाही. माझ्यावरही असे आरोप केले गेले. पण ज्यांनी आरोप केले त्यांनी सत्ता आल्यावर विधीमंडळात भाषण केलं. आम्ही विरोधक म्हणून आरोप करत आहोत, त्यात काही तथ्य नव्हतं. विरोधाला विरोधक म्हणून बोलत होतो. जेव्हा चित्र समोर येईल तेव्हा मलिक यांची स्थिती स्पष्ट होईल, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. फेसबूकवर पोस्ट टाकली म्हणून जिल्ह्याजिल्ह्यात केसेस दाखल करतात. जामीन मिळू दिला जात नाही. मात्र एकीकडे देश तोडू पाहणाऱ्या गँगशी संबंध असणाऱ्यांचा राजीनामा नाही. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे की पवारप्रेरित शिवसेना आहे? असा टोला चद्रकांत पाटील यांनी लगावला होता.
महत्वाच्या बातम्या-
माझ्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधाची रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
ऋताच्या लग्नात ऑनस्क्रिन जोडीदारच होता गैरहजर, स्वत: ऋतानेच याबाबत केला मोठा खुलासा
ऑलिंपीक मेडल भेटलं तर थेट मुंबईला जाणार आणि ‘या’ अभिनेत्याला भेटणार, निखतने व्यक्त केली इच्छा