राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राणे पिता – पुत्र सत्ताधारी नेत्यांवर टीका करत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वीच भाजप नेते निलेश राणे यांनी देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. आता त्याच प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘मला असा संशय येतो की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे, असा संशय मला येतो,’ असे निलेश राणे यांनी म्हंटले होते. राणे यांच्या या व्यक्तव्याने राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली असून, आता मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस (Mumbai Police) ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
त्यामुळे निलेश राणेंच्या अडचणींमद्धे वाढ होणार असल्याचे दिसतं आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या तक्रारी नंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. राणे बंधु हे जाणीवपूर्वक कट रचून समाजात प्रक्षोभक भाष्य करुन तेढ निर्माण करत दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
सूरज चव्हाण यांनी तक्रारीत म्हंटले आहेत की, नितेश राणे हे हिंदू-मुस्लिम गटात तेढ, द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं तक्रारीत म्हटलं आहे. शरद पवारांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडून अब्रुनुकसान करत आहेत. तसेच दाऊदशी संबंध जोडल्यानं शरद पवार यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? काय म्हणाले होते निलेश राणे? राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली आहे. मात्र, अद्यापही त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला नाही. यावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली असून मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलने देखील केली आहेत.
याविषयी बोलताना निलेश राणे म्हणाले होते, ‘अनिल देशमुख मराठा होते, त्यांचा घेतला राजीनामा. मलिकांसाठी वेगळा न्याय का? मला असा संशय येतो की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे, असा संशय मला येतो. ज्यानं दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला, त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? अनिल देशमुखांचा पटकन राजीनामा घेतलात, मग नवाब मलिक कोण आहे? कोण लागतो शरद पवारांचा?’असे सवाल उपस्थित केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
राहूल – सोनिया गांधी आज देणार काॅंग्रेसचा राजीनामा; संपूर्ण गांधी फॅमिलीच काॅंग्रेसपासून दूर जाणार?
समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्यायचे असेल तर निम्मे पैसे द्या; दानवेंची मागणी
“तो माझा नाही, मोदीजींचा मुलगा आहे”; युक्रेनमधून विद्यार्थी परतल्यावर वडिलांची भावूक प्रतिक्रिया
आजोबांचा नाद नाय! वयाच्या 65 व्या वर्षी सुरू केली औषधी वनस्पतींची शेती, आता कमावतात लाखोंमध्ये