महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच त्यांचा अयोध्या दौरा रद्द केला असल्याचे सांगितले आहे. तसेच रविवारी झालेल्या पुण्यातील सभेत त्यांनी दौरा रद्द करण्यामागचे कारणही सांगितले आहे. माझा दौरा रद्द व्हावा, यासाठी महाराष्ट्रातूनच रसद पुरवली गेली असल्याचे राज ठाकरेंनी म्हटले होते. (sharad pawar brijbhushan singh photo viral)
तसेच यावेळी राज ठाकरेंनी कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नव्हते. त्यामुळे राज ठाकरेंचा रोख भाजपकडे असल्याचेही अनेकांनी म्हटले होते. असे असतानाच आता मनसेचे सरचिटणीस सचिन मोरे यांनी एक फोटो ट्विट केला आहे. सध्या या फोटोमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी विरोध केला होता. तसेच माफी मागा अन्यथा अयोध्येत पाऊल ठेऊ दिला जाणार नाही, असे ते आक्रमकपणे म्हणताना दिसून येत होते. आता ब्रिजभूषण सिंग यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कुछ फोटो अच्छे भी होते है, और कुछ फोटो सच्चे भी होते है, असे कॅप्शन सचिन मोरे यांनी त्यांच्या ट्विटला देत हा फोटो शेअर केला आहे. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.
https://twitter.com/mnsmoresachin/status/1528802341528317953?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1528802341528317953%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Fmaharashtra%2Fmumbai-news%2Fthe-mns-leader-shared-a-photo-of-bjp-mp-brijbhushan-singh-with-ncp-president-sharad-pawar-and-mp-supriya-sule%2Farticleshow%2F91755291.cms
राज ठाकरेंनी ब्रिजभूषण सिंगांच्या विरोधामुळे दौरा रद्द केल्याचे म्हटले जात आहे. तसेच महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचेही राज ठाकरेंनी म्हटले होते. त्यामुळे ही रसद कोणी पुरवली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. असे असतानाच आता सचिन मोरे यांनी हा फोटो शेअर केला आहे.
दरम्यान, ब्रिजभूषण सिंग हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर शरद पवार हे राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत. सचिन मोरे यांनी शेअर केलेला हा फोटो एका कुस्तीच्या कार्यक्रमातील असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
आशा भोसलेंनी सांगितला अमेरिकेतील ‘तो’ भयावह प्रसंग; म्हणाल्या, तेव्हापासून मी मुलांना….
पुन्हा ‘तो’ येतोय! राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले मोठे विधान
सारा तेंडुलकरने लग्नात मराठमोळ्या अंदाजात पार पाडले सगळे विधी, फोटोंनी उडाली खळबळ