Share

शरद पवारांना नास्तिक म्हणणाऱ्या राज ठाकरेंना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिलं उत्तर; मंदिरातील फोटो व्हायरल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. तसेच त्यावरुन राज ठाकरेंवर राजकीय नेत्यांनी टीका केल्या होत्या. (sharad pawar at temple photo viral)

गुढीपाडव्याच्या त्या सभेनंतर राज ठाकरेंनी टीकांना उत्तर देण्यासाठी ठाण्यात मंगळवारी उत्तर सभा घेतली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारमधील नेत्यांवर टीका केल्या. उत्तर सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली होती.

आपल्याकडे हजारो वर्षांपासून जाती आहेत, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवले गेले, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच शरद पवार हे नास्तिक आहे. ते देव मानत नाहीत. तसेच त्यांचे देवळात हात जोडतानाचे फोटो सापडणार नाही, या शब्दांत राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली होती.

आता राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरेंना उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अनेक राष्ट्रवादीचे समर्थक टीकेला उत्तर देताना शरद पवारांचे मंदिरातील फोटो पोस्ट करताना दिसून येत आहे.

https://www.facebook.com/mlcsatishchavan/posts/525920612226422

हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर, श्री गणपतींसमोर शरद पवार हात जोडतानाचे फोटो कायकर्ते पोस्ट करताना दिसून येत आहे. राष्ट्रवादी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतिश चव्हाण यांनीही शरद पवारांचे मंदिरातील फोटो शेअर केले आहे. देवाच्या आशीर्वादाने सुर्योदयापासून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार सक्षम आहे, असे सतिश चव्हाण यांनी लिहिले आहे.

तसेच सोशल मीडियावर अनेक फोटो असेही व्हायरल होत आहे, जिथे शरद पवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही प्रतिमेसमोरही हात जोडताना दिसून येत आहे. तसेच फोटोंमध्ये शरद पवार ज्या मंदिरात दिसून आहे, त्या मंदिरांना शरद पवार यांनीच निधी मिळवून दिला असल्याचेही म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांना नास्तिक म्हणणाऱ्या राज ठाकरेंना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिलं उत्तर; मंदिरातील फोटो व्हायरल
युक्रेननंतर फिनलॅंडवर रशिया करणार आक्रमण, ‘या’ कारणामुळे संतापले पुतिन, पाठवले रशियन सैन्य
३०० रुपयांच्या भंगारातील सायकलला बनवले सौर सायकल, चालवायला एक रुपयाही नाही खर्च

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now