Share

वाकडा पाय टाकला, तर पाय काढून टाकण्यात येईल; राणेंच्या धमकीनंतर शरद पवारांचा व्हिडिओ व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे सध्या हे आसाममध्ये तळ ठोकून आहेत. (sharad pawar answer to narayan rane)

एकनाथ शिंदे यांच्या या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस आमदारांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळे नक्की पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशात सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही मैदानात उतरले आहे.

आमदारांना महाराष्ट्रात घेऊन या असे शरद पवारांनी म्हटले होते. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक ट्विट केले होते. आमदारांच्या केसालाही धक्का लागला तर घरी जाणं कठिण होईल, असे ट्विट नारायण राणे यांनी केले होते.

माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल, असे ट्विट करत नारायण राणे यांनी थेट शरद पवारांना धमकीच दिली होती.

अशात शरद पवारांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. धमकीवीरांसाठी पवार साहेबांचा मोलाचा सल्ला असे कॅप्शन देत अमोल मिटकरी यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे.

पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शरद पवारांनी धमकीवीरांना एक सल्ला दिला आहे. शरद पवार म्हणतात की, माझी त्यांना विनंती आहे की दमदाटीच राजकारण याआधी कुणी केलेलं नाही. पण जर त्यांनी ते केलं तर त्याला त्याची जागा दाखवली जाईल. त्याला सोडणार नाही.

तसेच शरद पवार पुढे म्हणतात की, तसंच सरळ आहे तोपर्यंत सरळ पण कोणी वाकडं पाऊल टाकलं तर तो पाय काढण्यात येईल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. तसेच राणेंच्या धमकीला शरद पवारांनी अजून कोणत्याही प्रकारचे उत्तर दिलेले नाही. पण सध्या शरद पवारांचा हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
“…तोपर्यंत मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा”, शेतकऱ्याचं राज्यपालांना पत्र
ज्यावेळी लोकांना उद्धव ठाकरे संपले आहेत असे वाटले, त्यावेळी नेमकं उलटंच घडलं! पहा त्यांचा रेकॉर्ड
गुलाबराव पाटील शिंदे गटासोबत नाहीत, ते तर मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ निरोप घेऊन गुवाहाटीला गेलेत?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now