Share

तुमचा वाढो न वाढो ‘या’ पठ्ठ्यांचा पगार दरवर्षी वाढतो; पोलिसांनी अटक केलेल्यांची कहानी ऐकून बसेल धक्का

उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय मोबाईल तस्कर शरद गोस्वामी याला एसओजी आणि दिल्ली गेट पोलिसांनी अटक केली. या टोळीतील नऊ जणांनाही पोलिसांनी पकडले आहे. यावेळी त्यांच्याकडे सापडलेला मुद्देमाल पाहून पोलिसही चक्रावले आहे. (sharad goswami arrested)

गोस्वामी आणि त्याच्या टोळीकडून २ कोटींहून अधिक किंमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यापैकी ६२ आयफोन आहेत. तसेच त्यांच्याकडे दीड लाख रुपयांची विदेशी दारू, एक कार आणि साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमालही सापडला आहे.

पोलिस लाइन्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत एसएसपी प्रभाकर चौधरी यांनी सांगितले की, दिल्ली गेट पोलिस ठाण्यातून शरद गोस्वामी याला पकडणाऱ्याला १० हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. तसेच एसओजी टीम शरद गोस्वामी आणि त्याच्या टोळीच्या सदस्यांच्या मागे लागली होती.

तसेच मंगळवारी या पथकाने शरद गोस्वामी आणि टोळीतील सदस्य राहुल उपाध्याय, अफजल राणा, रहिस, सारिक मलिक, मोहम्मद रशीद, फुरकान, अफजल, शाहरुख आणि मोहम्मद चांद यांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण २०७ मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यापैकी ६२ आयफोन आहेत, अशीही माहिती प्रभाकर चौधरी यांनी दिली आहे.

सर्व मोबाईलची किंमत २ कोटींहून अधिक आहे. याशिवाय दोन लॅपटॉप, एक कार, चार दुचाकी, दीड लाख रुपयांची दारू आणि साडेतीन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एसएसपीने सांगितले की, या टोळीतील ११ सदस्य अद्याप फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी एक पथक कार्यरत आहे.

शरद आपल्या टोळीत नवीन मुलांची भरती करायचा. तसेच त्याचे काम करणाऱ्यांना तो केवळ पैसेच देत नाहीत, तर त्यांच्या कामगिरीनुसार त्यांना वेळोवेळी बोनसही द्यायचा. तसेच तो दरवर्षी त्या तरुणांचा पगार वाढवायचा. त्यामुळे तरुणही त्याच्यासोबत काम करायला प्रेरित व्हायचे.

तसेच काम करणारा तरुण कुणी पकडला गेला तर त्याला जामीन मिळण्यासाठी आर्थिक मदतही शरद करत होता. पकडण्यात आलेल्या सर्वांचा गुन्हेगारी इतिहास आहे. आत्तापर्यंत त्यांच्याविरुद्ध असलेली ८ प्रकरणे उघडकीस आली आहेत, पोलिस तपास करत असून जवळपास १०० प्रकरणे समोर येऊ शकतात, असेही म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
काश्मिरमध्ये भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केली नमाज अदा, व्हायरल फोटोंनी जिंकली लोकांची मने
‘या’ पाच कारणांमुळे बिघडला प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा खेळ, वाचा सविस्तर..
पहिल्यांदाच समोर आली पूनम पांडेची आई, भावूक होत म्हणाली, ही माझी मुलगी नाही तर…

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now