प्रसिद्ध क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या मृत्युमुळे जगभरात शोककळा पसरली आहे. त्याचा मृत्यु हा घातपात असल्याचे म्हटले जात होते. पण आता याबाबत थायलंड पोलिसांनी माहिती दिली आहे. शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला असून त्यात घातपात किंवा चुकीचे कृत्य झाल्याचा संशय नसल्याचे थायलंड पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तपास अधिकारी लवकरच शवविच्छेदन अहवाल सादर करतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉर्नच्या मृत्यूची अनेक दिवसांपासून चौकशी सुरु होती. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शेन वॉर्नच्या कुटुंबीयांनाही शवविच्छेदनाच्या निकालाची माहिती देण्यात आली असून त्यांनी ती स्वीकारली आहे. त्याचा मृतदेह कुटुंबीयांना परत करण्यासाठी ऑस्ट्रेलियन दूतावासातील अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करण्याची तयारी सुरू आहे.
वॉर्नच्या कुटुंबीयांनी थायलंड पोलिसांना सांगितले की त्याला हृदयाचा त्रास आणि दमा आहे. याआधी, शेन वॉर्नचे मॅनेजर जेम्स एरस्काइन यांनीही खुलासा केला होता की, थायलंडला जाण्याच्या दोन आठवड्यापूर्वीच शेन वॉर्नने आपल्या आहारात बदल केला होता. यासोबतच वॉर्नने छातीत दुखणे आणि घाम येत असल्याची तक्रारही केली.
मृत्यूच्या काही दिवस आधी वॉर्नने इन्स्टाग्रामवर त्याचे जुने फोटो पोस्ट केले होते. तसेच तो म्हणाला, होता की तो वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत आहे. त्यानंतर शुक्रवारी शेन वॉर्नचे थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो ५२ वर्षांचा होता.
थायलंडमधील को सामुई येथे वॉर्नचा मृत्यू झाला. तो व्हिलामध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. डॉक्टरांनी सर्व प्रयत्न करूनही त्यांना शेन वॉर्नला वाचवता आले नाही.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक, वॉर्नने १९९२ मध्ये ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले, त्याने १४५ कसोटी सामने खेळले आणि ७०८ बळी घेतले.
वॉर्नने १९४ एकदिवसीय सामन्यांमध्ये २९३ विकेट घेतल्या. २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्रात राजस्थान रॉयल्सने त्याच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते. त्याने वयाच्या २४ व्या वर्षी ओल्ड ट्रॅफर्ड येथे १९९३ मध्ये इंग्लंडच्या माईक गॅटिंगला बाद केलेला चेंडू ‘शतकातील सर्वोत्तम चेंडू’ मानला जातो.
महत्वाच्या बातम्या-
गोव्यात भाजप काँग्रेसमध्ये जोरदार सामना; पहा कुणाला किती जागा मिळणार
भाजपच्या अंगातील माज अजून गेला नाही, त्यांची जिरवण्याची गरज आहे – धनंजय मुंडे
शिवसेनेच २५ आमदार नाराज; ‘या’ कारणावरून आपल्याच सरकारविरोधात थोपटले दंड






