Share

Virat Kohli: जावयाला विराट कोहलीने धु धु धुतल्यानंतर शाहिद आफ्रिदीचे बेताल वक्तव्य, म्हणाला, तिथे थर्ड अंपायर असता तर…

 Virat Kohli: भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी खूपच निराश दिसत आहे. हे त्यानी दिलेल्या विधानावरून लक्षात येते. 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नच्या मैदानावर भारतीय संघाने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यात कोहलीने कोणत्याही पाकिस्तानी गोलंदाजाला दयामाया दाखवली नाही. Shahid Afridi, Shaheen Afridi, India, Pakistan, Virat Kohli

किंग कोहलीनेही शाहिद आफ्रिदीचा जावई शाहीनला सोडले नाही. त्याच्या चेंडूंवर त्याने गगनचुंबी षटकारही मारले. त्याच वेळी, एका टीव्ही चर्चेत शाहिदला त्याचा भावी जावई शाहीन आफ्रिदीच्या खराब गोलंदाजीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी त्याने नो बॉलचा जप सुरू केला.

भारत आणि पाकिस्तान सामन्याचा इतिहास साक्षीदार आहे की जेव्हा-जेव्हा पाकिस्तानला भारताकडून पराभवाला सामोरे जावे लागते, तेव्हा तेव्हा त्यांनी पराभव टाळण्याचा किंवा कशाचा तरी आधार घेण्याचा प्रयत्न केला आहे. या सामन्यात पाकिस्तान संघ आपली कमकुवतता शोधण्याऐवजी नो बॉल आणि खराब अंपायरिंगची सबब पुढे करत आहे.

शाहीद आफ्रिदीने साम टीव्ही शोच्या अंपायरवर निशाणा साधताना म्हटले आहे की, तिसरे पंच आल्यापासून मैदानावरील पंच त्यांना फक्त सिग्नल देत असताना दिसले आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यातील तो एक महत्त्वाचा क्षण होता, जिथे तिसऱ्या पंचाचा रेफर घेत तो चेंडू नो बॉल होता की नाही हे पहिले असते. मात्र, त्यांनी लगेच नो बॉलचा इशारा दिला. मैदानी पंचाची एवढी काही तीक्ष्ण नजर नसते.

गुडघ्याच्या यशस्वी ऑपरेशननंतर शाहिद आफ्रिदीचा जावई शाहीन आफ्रिदी टी-20 वर्ल्ड कपमध्ये परतत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतरही त्याच्या गोलंदाजीला ती धार दिसून आली नाही ज्यासाठी तो ओळखला जातो. त्याने भारताविरुद्ध जोरदार फटकेबाजी केली, विराट कोहलीने त्याच्या षटकात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून सामन्याचा रंग बदलला.

ज्यावर एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलच्या अँकरने शाहिद आफ्रिदीला शाहीनच्या खराब गोलंदाजीशी संबंधित प्रश्न विचारला, तेव्हा त्याने या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले आणि आपयरिंगच्या चुकी गिरवायला सुरुवात केली. शाहीनने या सामन्यात 4 षटकात गोलंदाजी केली, ज्यामध्ये त्याने एकही विकेट न घेता 34 धावा दिल्या.

महत्वाच्या बातम्या-
Marathi Movie : ‘मराठी चित्रपटांना भीक लागलीय वाटतं, छत्रपती फक्त नाव नाही तर काळजाचा विषय आहे’
Eknath Shinde : उद्धवसाहेबांना भाजपशी युती करुन घ्या, असं सांगितलं होतं पण ते म्हणाले…; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा
AFG Vs AUS : बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नवख्या अफगाणिस्तानने रडवले, राशीदने एकट्याच्या बळावर…

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now