ऑस्ट्रेलियन खेळाडू जेम्स फॉकनरने अलीकडेच पाकिस्तान सुपर लीगमधून माघार घेण्याचा अचानक निर्णय घेतला. फॉकनरने त्याच्या फ्रँचायझी आणि पाकिस्तान क्रिकेटवर कराराची रक्कम न दिल्याचा आरोप केला. या आरोपांमुळे अनेकांनी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डावर टीका केली आहे. (Shahid afridi on jems faulkner)
आता या प्रकरणावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. आफ्रिदीने फॉकनरचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आणि पाकिस्तान क्रिकेट आणि पीएसएल ब्रँडला कलंकित करू नये, असेही शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे.
शाहीद आफ्रिदीने ट्विट केले की, निराधार आरोप करून पाकिस्तानच्या पाहुणचाराचा आणि व्यवस्थेचा बदला घेणार्या जेम्स फॉकनरच्या टिप्पण्यांमुळे निराश झालो. आम्ही सर्वांशी आदराने वागलो आहे आणि आमच्याकडून पेमेंटमध्येही कधीही विलंब झाला नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट आणि पीएसएल ब्रँडला कोणीही कलंकित करु नये.
Disappointed with @JamesFaulkner44 comments who reciprocated Pakistan's hospitality&arrangements by levelling baseless allegations.We al have been treated with respect &never ever our payments have been delayed. No one should be allowed to taint 🇵🇰, 🇵🇰cricket & the #HBLPSL brand.
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) February 19, 2022
असे सांगितले जात आहे की फॉकनर जेव्हा घरी परतण्यासाठी विमानतळावर जात होता, तेव्हा तो खूप रागावलेले दिसला. तो इतका संतापला की त्याने विमानतळावर जाण्यापूर्वी लॉबीच्या बाल्कनीतून बॅट आणि हेल्मेट फेकले, पीसीबीच्या अधिकाऱ्याशी झालेल्या चर्चेनंतर तो थेट हॉटेलपर्यंत गेला होता.
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू फॉकनरने यापूर्वीही पीसीबीवर पैसे न दिल्याचा आरोप केला होता. त्याने आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘मी पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची माफी मागतो. दुर्दैवाने मला शेवटच्या दोन सामन्यांतून माघार घ्यावी लागली. पीसीबीने माझा निश्चित पगार न दिल्यामुळे मला हे पाऊल उचलावे लागले आहे. मी संपूर्ण कालावधीसाठी येथे राहिलो, परंतु बोर्ड माझ्याशी खोटे बोलत राहिला.
फॉकनरने पुढच्या ट्विटमध्ये लिहिले की, लीग सोडताना दुःख होत आहे, कारण मला आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाकिस्तानमध्ये परत आणण्यासाठी मदत करायची होती. येथे खूप तरुण प्रतिभा आहे आणि चाहते आश्चर्यकारक आहेत, परंतु मला ज्या प्रकारे वागणूक दिली गेली ती पीसीबी आणि पीएसएलकडून अपमानास्पद आहे. मला खात्री आहे की तुम्हा सर्वांना माझी भूमिका समजली आहे.
महत्वाच्या बातम्या-
संजय राऊतांनी दिले किरीट सोमय्यांना आव्हान; म्हणाले, ‘या’ तीन प्रश्नांची उत्तरे द्या
धक्कादायक! हातपाय बांधून, तोंडात बोळा कोंबून सुनेला सासरच्यांनी जिवंत जाळलं, कारण वाचून हादरा बसेल
४० वर्षानंतर इतिहास घडणार; ऑलिम्पिक स्पर्धा आयोजनाच्या दृष्टीने भारताचे पहीले पाऊल