Share

हॉटेलचे ३७ वर्षे जुने बिल व्हायरल; शाही पनीर अन् दाल मखनीची किंमत वाचून हैराण व्हाल

सोशल मीडिया(Social Media) कधी काय व्हायरल होईल याची आपण कल्पना देखील करु शकतात नाही. सध्या सोशल मीडियावर एक छोटीशी चिठ्ठी व्हायरल होत आहे. आता तुम्ही प्रश्न पडला असेल ही चिठ्ठी नेमकी आहे तरी कसली. तर ती चिठ्ठि असली तसली नसून ते १९८५ सालचे हाॅटेलचे बिल आहे.

प्रत्येक व्यक्तीला घरातल्या जेवणाची चव चाखुन कंटाळा आला की, हाॅटेलमधील जेवण करायला आवडतं. आपण पाहतो अनेक मित्र एकत्र आले, कुटुंबातील कोणाचा वाढदिवस असेल किंवा कोणती पार्टी असेल तर लोक हाॅटेलमध्ये जेवायला जातात. असेच पुर्वीचे लोक सुद्धा जायचे. ज्याच बिल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

पिवळ्या रंगाचे हे बिल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये हे बिल१९८५चे असल्याचे दिसून येत आहे. बिलामध्ये शाही पनीर, दाल मखनी आणि रोटीची ऑर्डर देण्यात आली आहे. या पदार्थांची रेट लिस्ट यावर लिहीण्यात आली आहे. त्यावेळी शाही पनीर केवळ ८ रुपयांना मिळत होते, तर दाल मखनी आणि रायता अवघ्या ५ रुपयांना मिळत होते.

एवढेच नाही तर बिलात सर्व्हिस चार्जचाही समावेश करण्यात आला होता. त्याशिवाय रोटीची किंमत फक्त ७० पैसे होती. यामध्ये एकूण हे बिल २६ रुपये ३० पैसे असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे सर्व्हिस चार्ज फक्त २ रुपये लावण्यात आला आहे. त्याकाळी इतके कमी पैसे देऊन जेवण मिळत होते हे या बिलवरून समजत आहे.

त्यामुळे बिल व्हायरल होताच लोक त्याची आजच्या किमतीशी तुलना करू लागले. एकीकडे जिथे १९८५ मध्ये शाही पनीरची किंमत ८ रुपये होती, तिथे आज त्याची किंमत खूप वाढली आहे. वेगवेगळ्या हॉटेल्सच्या किमती नक्कीच वेगळ्या आहेत, पण त्या अनेक पटींनी वाढल्या आहेत. त्यामुळे सध्या हे जुने बिल प्रचंड व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या –

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now