Share

Shahajibapu patil : त्या उद्धव ठाकरेला म्हणावं दोन मिनीटं इथे येऊन जा मग.., शहाजीबापूंकडून उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख

Shahajibapu patil | सध्या ठाकरे गटाचा आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरू आहे. या दसरा मेळाव्यात शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला. शहाजीबापू म्हणाले की, गुलाबराव तुमच्याकडे फोन आहे का? तुमच्या पाया पडतो. त्या उद्धव ठाकरेंना फोन करा आणि दोन मिनीटं इथे येऊन जा म्हणावं.

खरी शिवसेना कोणती आहे ते तुला कळेल. हे भगवं वादळ उद्धव ठाकरे तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राची खरी शिवसेना कोणती याचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार नाही, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला.

पुढे ते म्हणाले की, खासदारांनी प्रत्येकाने जनतेला सांगितलं होतं की, निवडणूक झाल्यावर भाजप-शिवसेनेचं सरकार बनवू. निवडणूक झाली. मतमोजणी झाली. दोन्ही पक्षाचे आमदार निवडून आले. आम्ही आनंदात मुंबईत आलो आणि इथे आल्यावर बिघडा बिघडी सुरू झाली.

आज गद्दारी केली तेव्हा महाराष्ट्राने शाबासकी दिली असं म्हणायचं का? फडणवीसांच्या पाठित खंजीर खुपसला ते महाराष्ट्र अजून विसरला नाही. खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेला. मी काँग्रेसमध्ये होतो. बाळासाहेबांची सभा ऐकायचो. बाळासाहेब ठाकरे मैदाचं पोतं कोणाला म्हणाले? दाऊदचा हस्तक कोणाला म्हणाले? विलायती सोनिया गांधी मला चालणार नाही असं कोणाला म्हणाले? शिवसेना प्रमुखांनी हे उद्गार कोणासाठी काढले होते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पुढे शहाजीबापू म्हणाले की, आज एक घाव दोन तुकडे म्हणता, अडीच वर्षापुर्वी तुम्ही युतीचे तुकडे केले. आता कशाचे करता? तुम्ही आमदारांना फरफटत नेलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उकिरड्यावर फेकून दिलं. ते पाप उद्धव ठाकरे तुम्ही केलं, असा आरोपही त्यांनी केला.

शहाजीबापू असंही म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी ते पाप धुतलं. ही गद्दारी नाही. त्यांनी झालेल्या चुका दुरूस्त करण्यासाठी उचलेलं पाऊल आहे. आमच्या नेत्याचं अनेक मेळावे झाले. लाखोने लोक मेळाव्याला येत आहेत. हे कशाचं द्योतक आहे? असं शहाजीबापू भाषण करताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
Madhuri Dixit: भाड्याच्या घरातून आता स्वताच्या घरात शिफ्ट होणार माधुरी, तब्बल इतक्या कोटींना घेतला नवीन फ्लॅट
marriage: आजोबा रॉक्स! ६० वर्षांनी लहान मुलीसोबत केलं लग्न, ३ वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले, वाचून अवाक व्हाल
MNS : ‘टोमणे मेळाव्याची तयारी सुरू..मर्द छाताड, खंजीर, कोथळा, बॉम्ब, बाप पळवणारी टोळी’
shivsena : शिंदे गटाचा मोठा दावा, आज शिवसेनेचे २ खासदार ५ आमदार शिंदे गटात जाणार, ठाकरेंना बसणार झटका

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now