सध्या राजकीय वर्तुळात एका ऑडिओ क्लिपची तुफान चर्चा सुरू आहे. ती ऑडिओ क्लिप बंडखोर शिवसेना आमदार शहाजीबापू पाटलांची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये शहाजीबापू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केली आहे.
एवढच नाही तर पवारांसोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्याबाबत वादग्रस्त विधानं केली आहेत. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात शहाजीबापू पाटलांची ही ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल होतं आहे.
तर जाणून घ्या नेमकं काय म्हंटलं आहे शहाजीबापू पाटलांनी ऑडिओ क्लिपमध्ये..? ‘शरद पवार ते एक गोष्ट गोड बोलतात पण काटा काढल्याशिवाय राहत नाहीत. त्यांनी सेना संपवण्यासाठीच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं आहे,’ असं शहाजीबापू यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच जर ठाकरे भाजपाबरोबर गेले, तर ते येणाऱ्या काळात मोठे होतील, त्यांना आताच आवळून टाका, संधी सापडलीय, असलं पवारसाहेबांचे राजकारण असतं. पवारसाहेब राजकारणात जगाला गंडवतील पण आपल्याला उभ्या आयुष्यात गंडवू शकणार नाहीत. यशवंतराव चव्हाणांच्या तालिमीत तयार झालेली अवलाद आहे आपण,’ असं देखील त्यांनी म्हंटलं आहे.
दरम्यान, शहाजीबापू यांनी अजित पवारांना लक्ष करताना म्हंटलं आहे की, ‘अजित पवार सूडाचं राजकारण करतात.’ तसेच पुढे शिवसेना खासदार संजय राऊत यांना देखील शहाजीबापू यांनी लक्ष केलं आहे. ‘संजय राऊत नुसतं घाणा घालतात. भावाला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून ते शपथविधीच्या कार्यक्रमात रागात बोलत होते,’ असं देखील ऑडिओ क्लिपमध्ये आहे.
तर दुसरीकडे शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमध्ये ४६ आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘राजकारणाचे डावपेच चालूच राहतील, पण राज्यकारभार थांबायला नको, जनतेची कामं थेट माझ्याकडे आणा’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
‘संकटाच्या काळात पक्षाने विचारपूसही केली नाही’; आमदार यामिनी जाधवांनी व्यक्त केली खंत
मोदी सरकार महाराष्ट्राचे दोन तुकडे करणार; भाजपच्या बड्या मंत्र्यानेच केला गौप्यस्फोट
आम्ही मरेपर्यंत शिवसैनिक राहणार, काहीही झालं तरी शिवसेना सोडणार नाही; शिंदे गटातील आमदाराचा व्हिडीओतून संदेश