राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी या खटल्याची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. गेल्या आठवड्यात नवनीत राणा आणि त्यांच्या पतीला अटक करण्यात आली होती. ज्यानंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
नवनीत राणा यांनीही आपली अटक चुकीची ठरवत आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र कोर्टाने फेटाळून लावला. आज कदाचित तिची जेलच्या बारमधून सुटका होईल, अशी आशा राणाने व्यक्त केली होती.
मात्र, त्यांच्या सर्व आशांवर पाणी फेरत कोर्टाने आता पुढील सुनावनी आज होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी एक दिवस वाढला. तर दुसरीकडे ठाकरे सरकारने राणा दाम्पत्याची कुंडलीच बाहेर काढली आहे. दोघांवर ठिकठिकाणी एकूण 21 गुन्हे दाखल असून त्यातील काही गंभीर स्वरुपाचे असल्याचे उघडकीस झाले आहे.
त्यामुळे राणा दाम्पत्याला जामीन देऊ नये, अशी मागणी सरकारच्यावतीने न्यायालयात करण्यात आली आहे. सरकारच्यावतीने अॅड. प्रदीप घरत कोर्टात बाजू मांडत आहेत. ‘रवी राणा यांच्याविरोधात 17 आणि नवनीत राणा यांच्याविरोधा सहा गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे, असे अॅड. प्रदीप घरत यांनी सांगितले.
वाचा सविस्तर कोणते गुन्हे आहेत दाखल.. दरम्यान, ‘नवनीत राणा यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रांचा गुन्हा आहे. त्यांनी बोरीवली येथून खोटा शाळेचा दाखला मिळवला होता. हे मुद्दे न्यायालयासमोर मांडून जामीनाला विरोध केला जाणार असल्याचे घरत यांनी स्पष्टच बोलताना सांगितलं आहे.