Share

नवनीत राणा तोंडावर पडल्या! मुलीचा पोलिसांना खळबळजनक जबाब; आता राणांनाच फुटला घाम

navanit rana
भाजप खासदार नवनीत राणा या पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. अमरातीतील एका मुलीला तिच्या पतीने डांबून ठेवल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

काल नवनीत राणा यांनी एका मुलीच्या संदर्भाने लव्ह जिहादचा आरोप करत अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये राडा घातला. मुलीला आत्ताच्या आता आमच्यासमोर हजर करा, म्हणत त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. या प्रकरणाच्या चौकशीबद्दल राजापेठ पोलीस ठाण्यातील पोलिसांना विचारपूस केली असता, त्यांनी आपला फोन कॉल रेकॉर्ड केला असल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

मात्र आता या प्रकरणाला वेगळे वळण लागलं असल्याची माहिती मिळतं आहे. संबंधित तरुणीने काही कारणांना कंटाळून रागाच्या भरात घर सोडून गेले असल्याचं पोलिसांना सांगत नवनीत राणांना तोंडावर पाडलं. पहाटे चार वाजता अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तरुणीचा जबाब नोंदवला.

जबाब नोंदविताना तिने म्हटलं, की मी स्वतःहून रागाच्या भरात घरातून निघून गेले होते. खासदार नवनीत राणा यांनी माझी बदनामी केली असल्याचा गंभीर आरोपही या तरुणीने यावेळी केला. याचबरोबर अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुलीचा जबाब वाचून दाखवला आहे.

वाचा नेमकं प्रकरण काय?

अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण नुकतच समोर आलं. अमरावतीत आंतरधर्मीय विवाहाच्या मुद्द्यावरुन चांगचाल गोंधळ झाला. येथे एका मुलीला पळवून नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याप्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांना थेट पोलीस ठाण्यात जाऊन जाब विचारला.

अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील रुग्णवाहिकेवर चालक असणाऱ्या एका मुस्लीम व्यक्तीने सुशिक्षित हिंदू तरुणीशी लग्न केल्याचा प्रकार खासदार अनिल बोंडे यांनी नुकताच उघडकीस आणला होता. धक्कादायक बाब म्हणजे, मुस्लीम युवकाने तरुणीला विश्वासात घेत अमरावती येथील चंद्रविला या ट्रस्टकडून अवैधरित्या लग्न लावून घेतल्याची माहिती समोर आलेली.

या विवाहसंस्थाला परवानगी नसताना या विवाह संस्थेने बनावट लग्न प्रमाणपत्र दिल्याचा आरोप होता. या प्रकरणात नवनीत राणा यांनी उडी घेतली होती. पीडित मुलीच्या कुटुंबाच्या तक्रारीनंतर नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठले. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

‘या’ कारणामुळे २ महिन्यातच मुख्यमंत्री शिंदेंना वैतागले अधिकारी; वाचा नेमकं असं काय घडलं?
…तर आम्ही राज ठाकरेंनाच बाहेर काढू; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने स्पष्टच सांगीतलं
‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही’, शिंदे गटाने आखली वेगळीच रणनीती, उद्धव ठाकरेंसमोरील अडचणींमद्धे वाढ
पीएसआय भरती घोटाळ्यात भाजप आमदाराने घेतले पैसे; स्वत: कबुली देतं केला मोठा खुलासा, ऑडिओ क्लिप व्हायरल
इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now