राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (ajit doval) यांच्या घरात एका व्यक्तीने कार घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणतीही घटना घडण्यापूर्वीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. ही व्यक्ती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल टीमच्या ताब्यात असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे. (sensational-claim-of-a-person-trying-to-break-into-the-house-of-nsa-ajit-doval)
सध्या ही व्यक्ती चुकून त्यांच्या घरात घुसली की त्यामागे काही षडयंत्र आहे? हे स्पष्ट झालेले नाही. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, अज्ञात व्यक्तीने NSA अजित डोवाल यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला सुरक्षा दलांनी थांबवून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की, प्राथमिक तपासात ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे असे समोर आले आहे. ही व्यक्ती भाड्याने घेतलेली कार चालवत होती. संशयिताने चौकशीत सांगितले की, त्याच्या शरीरात चीप आहे आणि ती रिमोट कंट्रोलने दुसरं कोणीतरी नियंत्रित करत आहे.
अजित डोवाल यांना भारताचे जेम्स बाँड देखील म्हटले जाते. ते दहशतवादी संघटनांच्या नेहमी निशाण्यावर असतात. यापूर्वी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने अजित डोवाल यांच्या घराची आणि कार्यालयाची चाचपणी केली होती. जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केलेल्या जैशचा दहशतवादी हिदायतुल्ला यानेच हा खुलासा केला होता.
उरी आणि बालाकोटमध्ये भारताने केलेल्या हल्ल्यापासून पाकिस्तानी दहशतवादी संघटना अजित डोवाल यांच्याविरोधात सातत्याने कट रचत आहेत. दरम्यान, अजित डोवाल मूळचे उत्तराखंडचे आहेत. पठाणकोट ऑपरेशन यशस्वी करण्यात डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. डोभाल यांनी त्यांचा बहुतांश वेळ गुप्तचर खात्यात हेरगिरी करण्यात घालवला आहे.
भारताच्या सुरक्षमध्ये अजित डोवाल हे महत्वाची भूमिका बजावतात. भारताच्या सुरक्षेची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अजित डोवाल हे त्यांच्या निर्णयांमुळे ओळखले जातात. त्यांच्यामुळे अनेक दहशतवादी पकडले गेले आहेत त्यामुळे ते नेहमी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असतात. त्यांच्या सुरक्षेची खुप काटेकोरपणे काळजी घेतली जाते.
महत्वाच्या बातम्या
”हिजाब अश्लील असेल तर आरएसएसच्या खाकी शॉर्ट्सवरही बंदी घालावी”
बँकेच्या महाघोटाळा उघड झाल्यानंतर निर्मला सीतारमण यांनी दाखवले काँग्रेस सरकारकडे बोट, म्हणाल्या..
career tips: रिटायर झालेल्या लोकांनाही मिळेल या बँकेत नोकरी, जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची प्रक्रिया
career tips: रिटायर झालेल्या लोकांनाही मिळेल या बँकेत नोकरी, जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची प्रक्रिया






