Share

शिक्षण अधिकाऱ्यांचे डिसले गुरूजींवर खळबळजनक आरोप, डिसले गुरूजी राजीनामा द्यायच्या तयारीत

ज्या डिसले (disale guruji) गुरूंजीना अमेरिकेची स्कॉलरशिप मिळाली, ज्या डिसले गुरुजींना ग्लोबर टिचर पुरस्कार मिळाला आहे त्या व्यक्तीच्या कामावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी केले आहेत. (sensational-allegations-made-by-education-officials-against-disle-sir)

सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. लोहार यांनी हे आरोप केले असून या आरोपांमुळे सगळ्यांनाचा धक्का बसला आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद आहेत. अशावेळी डिसले गुरूजीच होते ज्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले होते.

डिसले गुरूजींनी शिक्षकांनी आपली गुणवत्ता कशी वाढवावी, ऑनलाईन शिक्षणाशिवाय दुसरे पर्याय त्यांनी शोधून काढले. परदेशात मुलांना कशा प्रकारे शिक्षण दिले जाते याचा अभ्यास त्यांनी केला. याचाच परिणाम असा झाला की त्यांची वर्ल्ड बँकेच्या शिक्षण सल्लागारपदी निवड झाली होती. त्यानंतर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.

जेव्हा त्यांना अमेरिकेची स्कॉलरशिप जाहीर झाली तेव्हा त्यांनी आपल्या रजेचा अर्ज शिक्षण अधिकाऱ्यांकडे दिला होता. साधारण दीड महिन्यांपुर्वी त्यांनी रजा टाकली होती. पण त्यांच्या अर्जात खुप त्रुटी असल्यामुळे त्यांची रजा अजूनही मंजुर करण्यात आली नाही. अर्ज नामंजूर करण्याचं कारण अदयाप समोर आलेलं नाही.

शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. गेल्या ३ वर्षांपासून डिसले गुरूजी शाळेत गैरहजर आहेत. रजा अर्जात त्रुटी असल्याने तो मंजूर झाला नाही. परदेशात स्कॉलरशिपला गेल्यानंतर शाळेचं काय करणार? आधी शाळेच्या मुलांना शिकवायला हवं ना? जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी त्यांनी काही प्रयत्न केलेत असे मला दिसले नाही, असे अनेक आरोप प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. लोहार यांनी केले आहेत.

यावर डिसले गुरूजींनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी जे आरोप केले आहेत, त्याच्या संदर्भात लेखी आदेश जिल्हा परिषदेकडून मिळाल्यास त्यावर आपली भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या
पाच लाख दे नाहीतर माझ्यासोबत.., पोलीस उपनिरीक्षकाने घेतला महिलेच्या परिस्थितीचा गैरफायदा
ठरलं! उत्पल पर्रीकर पणजीतून अपक्ष लढणार; भाजपवर केलेल्या गंभीर आरोपांनी उडाली खळबळ
दार बंद करून आई-वडील करायचे हे घाणेरडे कृत्य, घराच्या भिंती पाहून मुलीला बसला धक्का
माजी मुख्यमंत्र्यासहीत तीन बड्या नेत्यांची बंडखोरी; भाजपला भलेमोठे भगदाड

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now