राज्याच्या राजकारणात गेल्या दहा दिवसांत मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्याच आपण पाहिलेलं आहे. शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. तर दुसरीकडे आता शिंदे गटाने भाजपसोबत हात मिळवणी करून राज्यात नवं सरकार स्थापन केलं आहे. या सर्व घडामोडींमुळे शिवसेनेत मोठी फुट पडल्याच पाहायला मिळत आहे.
महत्वाची बाब म्हणजे एक – दोन नव्हे तर तब्बल शिंदे गटात शिवसेनेचे तब्बल ३७ आमदार सामील झाले आहेत. शिंदे यांनी केलेल्या या बंडामुळे अख्ख महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. सरकार अल्पमतात येताच उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
तर आता शिंदेंशी जुळवून घेण्याची आमदारांपाठोपाठ खासदारांनी मागणी केली आहे. शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १२ खासदार देखील वेगळा विचार करणार असल्याची माहिती हाती आली आहे. यामुळे आता आणखी शिवसेनेला खिंडार पडणार असल्याच चित्र सध्या दिसत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी शिवसेना खासदारांच्या एका गटानं उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार भाजपाच्या एका एका केंद्रीय नेत्यानं दावा केला की सेनेतील आमदारांच्या बंडाचे परिणाम खासदारांवरही पाहायला मिळतील.
यामुळेच शिवसेनेचे डजनभर खासदार वेगळी भूमिका घेण्याच्या विचार करत असल्याच बोललं जातं आहे. त्याचबरोबर पक्षातील ज्येष्ठ नेत्यानं शिंदेंच्या नेतृत्त्वातील बंडखोर आमदारांना पुन्हा पक्षात सामील करुन घेण्याबाबतची विनंती उद्धव ठाकरेंकडे केली.
मात्र खासदारांनी केलेल्या विनंतीला उद्धव ठाकरेंनी केराची टोपली दाखवल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या शिवसेनेचे काही खासदार आजही शिंदेंच्या भूमिकेशी सहमत असल्याच पाहायला मिळत आहे. दरम्यान, जर खासदारांनी देखील शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला, तर शिवसेनेला मोठ खिंडार पडलं.
महत्वाच्या बातम्या-
चित्रपटसृष्टीवर शोककळा, प्रसिद्ध अभिनेत्याचा वयाच्या 30 व्या वर्षी ‘या’ भयानक आजाराने मृत्यु
पंतने एका झटक्यात मोडला धोनीचा 17 वर्षांपुर्वीचा रेकॉर्ड, 120 वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं काही..
‘माझ्यावर रोज २० ते २५ जण बलात्कार करतात, अन् माझे आई वडील..; मुलीच्या गंभीर आरोपांनी खळबळ