…म्हणून आम्ही शिंदें गटात सहभागी झालो; बंडखोर शिवसेना आमदाराने तीन दिवसांनी सांगितलं खरं कारण

अजूनही शिवसेना शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यात यश आलेलं नाहीये. राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केल्याने राज्यात राजकीय भूकंप निर्माण झाला आहे.

यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. राज्य सरकारला धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील राजीनामा देण्याची शक्यता आहे. अशावेळी एकनाथ शिंदे यांनी केलेली ही बंडखोरी तात्काळ कारणांनी झाली नसून, त्यामागे अनेक दिवसापासूंनची कारणं जबाबदार असल्याचं बोललं जात आहे.

तर अशातच आता बंडखोर शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘आमचा वेगळा गट नाही, आम्ही शिवसेनेतच राहणार असल्याच गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना याबाबत भाष्य केलं आहे.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, सेना-भाजपने मिळून राज्यात सत्ता स्थापन करावी अशी शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांची आहे. पक्षातील फुट टाळण्यासाठी भाजपसोबत जाण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत माझ्यासह काही आमदारांनी विनंती केली होती, असं पाटील यांनी सांगितलं.

पुढे बोलताना पाटील यांनी सांगितलं, ‘मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. तर दुसरीकडे अनेक आमदारदेखील शिंदे यांच्यासोबत जात असल्याने सेनेचे हित लक्षात घेवून, शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय मी घेतला असल्याच पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, ‘आम्ही वेगळा गट स्थापन करणार नाही. शिवसेना म्हणून आम्ही कायम एकत्र राहणार असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. सध्या एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतल्यानं शिवसेनेसमोर अभूतपूर्व संकट निर्माण झालं आहे. आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार संकटात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
“पवारसाहेब जोपर्यंत आखाड्यात आहेत, तोपर्यंत भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही”
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद का नाही दिलं? उद्धव ठाकरेंनी सांगितला पवारांसोबतचा ‘तो’ किस्सा
मी कधी बंड करेल का? डोळ्यांत पाणी आणून शिंदे बोलले अन् भावूक झालेले ठाकरे जाळ्यात अडकले; वाचा इनसाईड स्टोरी
माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर…; उद्धव ठाकरेंचे आमदारांना भावनिक आवाहन