शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे हे खुप जोखीमचे काम असते. पण जर त्याचा अभ्यास करुन तुम्ही पैसे गुंतवले तर हेच शेअर मार्केट तुम्हाला मालामाल करत असते. शेअर मार्केटमध्ये काही शेअर्स गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देताना दिसून येतात. आज आपण अशाच काही शेअर्सबद्दल बोलणार आहोत. (sel stock with bumper returns)
आज आम्ही शेअर मार्केटमधल्या अशा जबरदस्त स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने केवळ दोन वर्षांत गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. दोन वर्षांत, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना १,६५,३७५ टक्के इतका धक्कादायक परतावा दिला आहे.
हा विशेष स्टॉक आहे – SEL Manufacturing Company Ltd चा. गेल्या काही ट्रेडिंग सत्रांमध्ये कंपनीचा शेअर सातत्याने वरच्या सर्किटवर राहिला आहे. हा स्टॉक ५२ आठवड्यांपासून उच्चांकावर आहे. SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स बुधवारी BSE वर ५ टक्के वाढीसह ६६१.९० रुपयांवर बंद होते.
या स्टॉकने गेल्या दोन वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. ९ एप्रिल २०२० रोजी SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेअरची किंमत BSE वर ४० पैसे होती तर १३ एप्रिल २०२२ रोजी ती वाढून ६६१.९० रुपये झाली. म्हणजेच या कालावधीत या समभागाने १,६५,३७५ टक्के बंपर परतावा दिला आहे. त्याच वेळी, SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने गेल्या सहा महिन्यांत १३.१११.५८ टक्के परतावा दिला आहे.
आतापर्यंत या स्टॉकने YTD मध्ये या वर्षी १,५७५.७० टक्के परतावा दिला आहे. ३ जानेवारी २०२२ रोजी त्याची किंमत ३९.५० रुपये होती, तर एका महिन्यात त्याची किंमत ६६१.९० रुपये झाली. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये या शेअरने जवळपास २२ टक्के परतावा दिला आहे. एवढेच नाही तर हा शेअर अजूनही वाढतच जात आहे.
SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडच्या शेअरच्या किमतीचा इतिहास पाहिला तर तो हैराण करणारा आहे. जर एखाद्याने दोन वर्षांपूर्वी या शेअरमध्ये १ लाख रुपये ४० पैसे प्रति शेअर दराने गुंतवले असते, तर त्याला आज १६.५४ कोटी रुपयांचा नफा झाला असता.
तसेच जर एखाद्याने या शेअरमध्ये ६ महिन्यांपूर्वी ५.०१ रुपये दराने एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्यांना १.३२ कोटींचा जबरदस्त फायदा झाला असता. हा परातावा खुपच हैराण करणारा आहे. इतका परतावा मिळत असतानाही याच्यात गुंतवणूक करणे आर्थिकदृष्या धोकादायक असू शकते, त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तुम्ही तज्ज्ञांचे मत जाणून घेणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या-
तुम्ही हनुमान चालिसाबद्दल बोलताय, तुम्हाला त्याच्या दोन ओळीपण म्हणता येत नाही; मिटकरींचा राज ठाकरेंना टोला
प्रशासनाने चार-चार वर्षे फाईली दाबून ठेवल्या नसत्या तर कोळशाचा तुटवडा नसता पडला, गडकरी स्पष्टच बोलले
हा कुंभकर्ण २० वर्षांपासून झोपला होता का? जेम्स लेनच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड भडकले