Share

‘या’ कंपनीने शेअर मार्केटमध्ये घातला धुमाकूळ, १ लाखाचे केले ३ कोटी तेही फक्त ६ महिन्यात

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे हे खुप जोखीमचे काम असते. पण जर त्याचा अभ्यास करुन तुम्ही पैसे गुंतवले तर हेच शेअर मार्केट तुम्हाला मालामाल करत असते. शेअर मार्केटमध्ये काही शेअर्स गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देताना दिसून येतात. इतकंच नाही, तर काही शेअर लाखो रुपयांना कोट्यवधी रुपये सुद्धा बनवतात. (Sel company in share market)

आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत. ज्याने गुंतवणूकदारांना खुप कमी काळात करोडपती बनवले आहे. तुम्ही या शेअरमध्ये गुंतवणूक केली नसली तरीही काळजी करू नका, कारण तुम्ही आताही या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकता.

बाजारात घसरण होत असली तरी हा स्टॉक सातत्याने तेजीत दिसून येत आहे. एवढेच नाही तर या शेअरने अवघ्या एका महिन्यात सुमारे ३०० टक्के परतावा दिला आहे. हा SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा शेअर आहे. या कंपनीच्या शेअरने गेल्या काही महिन्यांतील परताव्याचे मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

ज्याने ऑक्टोबरमध्ये या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, त्याचे शेअर्स आज ३ कोटींहून अधिक झाले असेल. गेल्या काही दिवसांपासून हा स्टॉक रॉकेटच्या वेगाने वाढत आहे. तसेच या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना तो जबरदस्त परतावाही देत आहे.

२८ ऑक्टोबर २०२१ रोजी, शेअरची किंमत NSE वर फक्त ४.९५ रुपये इतकी होती. जी २१ एप्रिलच्या ट्रेडिंग सत्रात १५४८.२० रुपये इतकी झाली आहे. सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या स्टॉकने ३० हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

या कंपनीच्या शेअर्समध्ये २८ ऑक्टोबरला १ लाख रुपये गुंतवून गुंतवणूकदाराला शेअरचे २०,२०२ युनिट मिळाले असते. आज त्याच २०,२०२ युनिट्स शेअरची किंमत सुमारे ३.१२ कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. म्हणजेच ज्याने या कंपनीत सहा महिन्यांपूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते, तो आज ३ कोटींचा मालक असता.

महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्माने मॅच फिक्सिंग केली? सलग सातव्या पराभवानंतर रोहितवर झाला गंभीर आरोप
फक्त रोज ३० रुपये वाचवा अन् करोडपती व्हा; बचतीची ‘ही’ भन्नाट आयडिया ऐकून हैराण व्हाल
“शिवाजी महाराजांना बदनाम करण्याच्या कटात राज ठाकरेंचा सहभाग”

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now