Virat Kohli, Rahul Dravid, Sandesh, Rohit Sharma/ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने आणखी एक मालिका जिंकली आहे. यासह, भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 238 धावांचे लक्ष्य दिले. जे पाहुण्या संघाला साध्य करण्यात अपयश आले.
फॉर्ममध्ये परतलेल्या किंग कोहलीने आपल्या डावाची आक्रमक सुरुवात केली. पहिल्या काही चेंडूंत तो धमाकेदार पद्धतीने रन गोळा करत होता, पण जेव्हा सूर्यकुमार यादवने वेगवान खेळायला सुरुवात केली तेव्हा कोहलीला कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडने डगआउटमधून थोडसं हळू आणि सावधगिरीने खेळण्याचा संदेश पाठवला. होय, खुद्द विराट कोहलीने सामन्यानंतर याबद्दल सांगितले.
सामन्यानंतर किंग कोहली म्हणाला, जेव्हा सूर्याने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली तेव्हा मीही डगआउटकडे पाहिले. रोहित आणि राहुल भाई दोघेही मला म्हणाले, तू फक्त फलंदाजी करत रहा कारण सूर्या चांगली फटकेबाजी करत होता. हे फक्त एक भागीदारी तयार करण्याबद्दल होते. मी फक्त माझ्या अनुभवाचा थोडासा उपयोग केला.
सूर्यकुमार यादवचे कौतुक करताना विराट कोहली पुढे म्हणाला की, त्याला काय करायचे आहे याबद्दल त्याच्याकडे पूर्ण स्पष्टता आहे. त्याच्याकडे कोणत्याही स्थितीत फलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्याने आधीच दाखवून दिले आहे. त्याने इंग्लंडमध्ये शतक झळकावले, आशिया कपमध्ये त्याने शानदार फलंदाजी केली. इथेही तो बॉल मारतोय तसेच मी त्याला स्ट्राइक करताना पाहत होतो. गेल्या 6 महिन्यांपासून तो चांगला खेळत आहे.
त्याच्याकडे विविध प्रकारचे शॉट्स आहेत आणि ते शॉट्स योग्य वेळी खेळणे हे एक जबरदस्त कौशल्य आहे. तो असा माणूस आहे ज्याला त्याचा खेळ आतून माहित आहे. त्याला वेळेची देणगी मिळाली आहे आणि त्याला त्याचे शॉट्स खेळताना पाहून मी थक्क झालो.
महत्वाच्या बातम्या-
IND vs AUS : विराट सुर्यापुढे ऑस्ट्रेलियाचे अक्षरश: लोटांगण; भारताने सामन्यासह मालिका जिंकत कांगारूंची जिरवली
VIDEO: विराट कोहलीच्या धमाकेदार खेळीवर रोहितही झाला फिदा, दिली ‘जादू की झप्पी’
Virat kohli : विराटच्या चुकीमुळे जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला सुर्यकुमार झाला आऊट? सोशल मीडियावर होतोय ट्रोल, ‘त्या’ ओव्हरमध्ये काय घडलं?