Mahindra & Mahindra ने नवीन पिढीच्या Scorpio बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. कंपनीने सांगितले की नवीन SUV भारतीय बाजारात 27 जून 2022 ला लॉन्च होणार आहे. कंपनी Scorpio N नावाने नवीन SUV लाँच करणार आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या सध्याच्या मॉडेलची विक्री Scorpio Classic या नावानेही सुरू ठेवली जाईल. महिंद्राने अलीकडेच पुष्टी केली आहे की बॉर्न ईव्ही एसयूव्हीच्या सर्व-नवीन श्रेणीचे 15 ऑगस्ट 2022 रोजी अनावरण केले जाईल. नवीन पिढीच्या स्कॉर्पिओ एनच्या उत्पादनाबाबत झालेल्या चर्चेदरम्यान कंपनीने ही माहिती दिली आहे.
नवीन जनरेशन स्कॉर्पिओचे पेट्रोल इंजिन एसयूव्हीच्या डिझेल इंजिनपेक्षा अधिक शक्तिशाली असल्याचे ताज्या माहितीतून समोर आले आहे. महिंद्रा ऑटोमोटिव्ह या महिन्यात 2022 Scorpio N चे उत्पादन सुरू करणार आहे. कंपनीने आगामी 2022 स्कॉर्पिओचा नवीन टीझर जारी केला आहे. या टीझरमध्ये महिंद्रा स्कॉर्पिओला बिग डॅडी ऑफ एसयूव्ही असं संबोधण्यात आलं आहे.
यासोबतच कंपनीने गाडीच्या सुरक्षिततेबाबत एक ओपिनियन पोलही सुरू केला होता, ज्यामध्ये ९४ टक्के लोकांनी याला सहमती दर्शवली होती. बाकीच्या ६ टक्के लोकांनी याला सहमती दर्शवली नव्हती. नवीन पिढीची महिंद्रा स्कॉर्पिओ सुरक्षिततेच्या बाबतीत मजबूत असेल आणि महिंद्राला ग्लोबल एनसीएपीमध्ये 5-स्टार रेटिंग मिळवून देण्यास ही गाडी पुर्ण पात्र ठरेल असा अंदाज बांधला जात आहे.
अलीकडे, नवीन पिढीच्या स्कॉर्पिओ एनच्या केबिनचे काही फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत, ज्यामध्ये एसयूव्हीच्या मुख्य वैशिष्ट्यांची माहिती समोर आली आहे. 2022 महिंद्रा स्कॉर्पिओला मिळणार्या इतर वैशिष्ट्यांपैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे अलीकडेच लाँच झालेल्या Mahindra XUV700 मध्ये पाहिल्याप्रमाणे एडव्हान्स ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टम असू शकते. कारच्या टॉप मॉडेलमध्येही हे फिचर असण्याची शक्यता आहे.
येथे ग्राहकांना 10-स्पीकर ऑडिओ सिस्टीम, 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, एलईडी लाईट्स ऑल ओव्हर, 6 एअरबॅग्ज आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञान यांसारखी हाय-टेक वैशिष्ट्ये देखील मिळू शकतात. कंपनी या कारसोबत 360-डिग्री कॅमेरा देखील देणार आहे, ज्यामुळे नवीन स्कॉर्पिओ सुरक्षिततेच्या दृष्टीने एक उत्तम SUV बनणार आहे.
काही काळापूर्वी भारतात लॉन्च करण्यात आलेले महिंद्रा XUV700 इंजिन आगामी नवीन जनरेशन महिंद्रा स्कॉर्पिओसोबत दिले जाईल असे मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे. नवीन SUV सोबत उपलब्ध होणार्या इंजिनची पॉवर फिगर देखील XUV700 सारखीच असणार आहे, हे देखील समोर आले आहे.
2022 स्कॉर्पिओला 2-लिटर पेट्रोल आणि 2.2-लिटर टर्बो-डिझेल इंजिन पर्याय मिळतील ज्यामध्ये पेट्रोल इंजिन 200PS आणि डिझेल इंजिन 185PS पॉवर जनरेट करते. XUV700 शी जोडलेली इंजिने SUV ला 200 kmph चा वेग देऊ शकतात. नवीन स्कॉर्पिओच्या इंजिन पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळण्याची अपेक्षा आहे.
थार आणि XUV700 प्रमाणे, Scorpio-N ला देखील ग्राहकांना डिलीव्हरीसाठी खुप वाट पाहावी लागणार आहे. सध्या, महिंद्र थारसाठी प्रतीक्षा कालावधी 11 महिने आहे आणि XUV700 साठी 20 महिने आहे. असे मानले जाते की Scorpio-N चा वेटिंग पिरीअड दोन वर्षांचा असू शकतो. म्हणजेच, जर तुम्ही आज गाडी बुक केली तर तुम्हाला ती गाडी जुन 2024 मध्ये मिळणार. असे बोलले जात आहे की बुकींग्सच्या बाबतीत स्कॉर्पिओ सर्व रेकॉर्ड मोडू शकते.
महत्वाच्या बातम्या
केकेच्या निधनानंतर मनोरंजनविश्वाला आणखी एक धक्का, प्रसिद्ध संगीतकाराचा २२ व्या वर्षी मृत्यू
टार्गेट किलिंगची भीती! हजारो हिंदूंनी काश्मीर सोडलं; केंद्र सरकार नेमकं करतंय तरी काय..?
मी Gay….; शाहरुख खानचा सोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींसोबतच्या नात्याबाबत मोठा खुलासा
मी Gay….; शाहरुख खानचा सोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींसोबतच्या नात्याबाबत मोठा खुलासा