अभिनेते आणि निसर्गप्रेमी असणारे सयाजी शिंदे (sayaji shinde) यांच्या कल्पनेतून उभा राहिलेल्या सह्याद्री देवराईला (sahyadri devrai) भीषण आग लागली आणि अनेक झाडे जळून खाक झाली. आगीत जवळजवळ 500 झाडं जळून खाक झाली. आगीबद्दल वेगवेगळे संशय व्यक्त केले जात आहेत. या घटनेमुळे सामाजिक कार्यकर्त्यांसह अनेक निसर्गप्रेमी हळहळ व्यक्त केली जात होती. (sayaji shinde first reaction on sahyadri devrai fire)
ज्या सह्याद्री देवराईला आग लागली ती बीड जिल्ह्यातील पालवन येथील आहे. बीड जिल्ह्यात पडत असणारा सततचा दुष्काळ, कुठे तरी दूर व्हावा आणि जिल्ह्यात पर्यटन केंद्र बनावे, या उद्देशाने अभिनेते सयाजी शिंदे यांनी त्यांच्या कल्पनेतून ही सह्याद्री देवराईची स्थापना केली होती. यानंतर सयाजी शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी हात जोडून लोकांना एक विनंती केली आहे. ते म्हणाले की, अशाप्रकारचं नुकसान पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्याची विनंती केली आहे. राज्यभरामध्ये तुम्ही सह्याद्री वनराईच्या माध्यमातून वृक्ष चळवळ सुरू केली आहे. एकीकडे तुम्ही काम करत असताना दुसरीकडे सातत्याने सह्याद्री वनराईचं नुकसान केलं जात आहे.
असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना सयाजी शिंदे म्हणाले की, प्रयत्न करणं ही सर्वांची जबाबदारी आहे. ही एवढी मोठी जागा असते त्यात चुकून कोणीतरी आग लावतो. त्यांना हात जोडून विनंती आहे की असं करू नका. यामुळे संपुर्ण मानवजातीचं नुकसान होत आहे.
शासनाने ग्रामपंचायतीने आणि सर्वसामान्यांनीही प्रयत्न केले पाहिजेत. हे असं नुकसान होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे, असं ते म्हणाले आहेत. त्यानंतर त्यांनी वृक्षारोपणाचे फायदे सांगितले. हे सगळं काम आपण आनंदासाठी करतोय. नम्र व्हावं कोणापुढे तर झाडापुढे व्हावं या हेतून आपण सर्वजण काम करतोय.
आपण पैसा मिळवून बघतो, गाड्या घेऊन बघतो पण शेवटी उपयोगाला कोण येतं तर ऑक्सिजन. उपयोगाला कोण येतं तर झाडं आणि त्यांनी दिलेलं अन्न. जगात कोणीही कोट्याधीश असला तरी तो अन्न तयार करतो का? ती जादू फक्त झाडालाच येते. म्हणून आपण झाडांशी नम्र राहिलं पाहिजे, असं सयाजी शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
NSA अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा खळबळजनक दावा, म्हणाला..
‘तुमचा पठ्ठ्या घोडी धरणार म्हणजे धरणार’, अमोल कोल्हेंनी शब्द पाळला, घोडीवर स्वार झाले आणि..
IND vs WI, T20: ऋषभ पंतचे झाले प्रमोशन, वेस्ट विंडीज मालिकेसाठी मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी
तंबाखूपासून मुक्तता मिळवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचा अनोखा उपक्रम, लॉन्च केले ऍप