गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटविश्वातून अनेक हैराण करणाऱ्या बातम्या येत होत्या. विराट कोहलीची कर्णधार पदावरुन हकालपट्टी, रोहितला कर्णधारपद अशा गोष्टी समोर येत होत्या. यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीही चर्चेत येत होते. (saurav ganguli resign bcci president)
अशात सौरव गांगुली यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. सौरव गांगुली यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या बातमीमुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली आहे. सौरव गांगुली यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रमुख सौरव गांगुली आता काहीतरी नवीन करण्याच्या तयारीत आहेत. गांगुली यांनी एक नुकतेच एका ट्विटमध्ये जाहीर केले आहे की, ते लोकांच्या भल्यासाठी काहीतरी नवीन करणार आहे. सध्या गांगुली यांचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे.
आता सौरव गांगुली काय करणार? याबाबत लोक अंदाज लावत आहे. क्रिकेटनंतर गांगुली आता राजकारणातही आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे, असे अनेकांनी मत व्यक्त केले आहे. तसे झाले तर ते कोणत्या पक्षात जातील किंवा कोणता पक्ष स्थापन करतील त्याच्याही चर्चा सुरु आहे.
सौरव गांगुली यांनी बुधवारी क्रिकेटविश्वात आपले ३० वर्षांचे करीअर पुर्ण केले आहे. त्यानंतर आता आज सौरव गांगुलीने ट्विट केले आहे. गांगुली यांनी या पोस्टच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आहे की, ते आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे आणि एका नवीन इनिंगला सुरुवात करत आहे.
सौरव गांगुलींच्या या ट्विटनंतर वेगवेगळ्या चर्चांण उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सौरव गांगुली राजकारणात एंट्री घेतील अशी चर्चा होती अशातच त्यांनी राजीनामा दिला आहे, त्यामुळे या चर्चांणा आणखी उधाण आले आहे. पश्चिम बंगालमध्ये सौरव गांगुली खुप प्रसिद्ध आहे, त्यामुळे असे म्हटले जात आहे की ते पश्चिम बंगालच्या राजकारणात पाऊल ठेऊ शकतात. गेल्या महिन्यातच ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले होते.
महत्वाच्या बातम्या-
अनोळखी मुलीला चहलने केला मेसेज, मुलीने ऍक्शन घेताच मागावी लागली माफी, पहा फोटो
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण…; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर
मुंग्यांमुळे सापडली देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण, वाचा नक्की काय घडलं होतं ४० वर्षांपूर्वी