Share

मी पंतप्रधान मोदींना घाबरत नाही, थेट आव्हान देऊ शकतो; मलिकांचा हल्लाबोल

narendra modi

गेल्या काही काळापासून मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. मग तो काश्मीर प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांची समस्या असो. पुन्हा एकदा मलिक यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास ते हिंसाचाराचा मार्ग स्वीकारू शकतात. दिल्लीने शेतकऱ्यांशी पंगा घेऊ नये, असा सल्ला मलिक यांनी दिला.

ते याबाबत जोधपूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना मलिक म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास, ते त्यांना पटवून देण्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करू शकतात. केंद्राने शेतकऱ्यांशी लढा देऊ नये, असा माझा दिल्लीला सल्ला असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, मलिक म्हणाले की, मी दिल्लीत दीड खोलीच्या घरात राहतो. त्यामुळे मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोदींना आव्हान देऊ शकतो. मी मोदींना घाबरत नाही, असे म्हणत मलिक यांनी थेट पंतप्रधान मोदींना लक्ष केले. यामुळे पुन्हा एकदा मलिक विरुद्ध पंतप्रधान मोदी असा वाद रंगण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच त्यांनी मोदींना लक्ष केले होते. भाजप सरकारने आपल्याला अध्यक्षपदाचं आमिष दाखवलं, असं म्हणत मलिक यांनी मोदींवर हल्लाबोल चढवला होता. हरियाणाच्या जिंदमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले होते. यावेळी बोलताना मलिक यांनी मोदी सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही केला.

तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता. तसेच मलिक म्हणाले होते की, “मला सांगण्यात आलं होतं की, जर तुम्ही गप्प बसलात, तर तुम्हाला अध्यक्ष बनवलं जाईल,” असे मलिक यांनी सांगितले.

तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने न बोलल्यास त्यांना राष्ट्रपतीपदी बढती दिली जाईल, असे भाजपामधील त्यांच्या काही मित्रांनी सांगितल्याचा दावाही मलिक यांनी केला होता. तसेच पुढे बोलताना मलिक म्हणाले होते की, त्यांनी प्रत्येक मार्गाने आपल्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

महत्त्वाच्या बातम्या
नादच! एका एकरात तब्बल १३० टन ऊस, तेही दु्ष्काळी भागात, महाराष्ट्रातील शेतकऱ्याची देशभर चर्चा
राज्यमंत्री बच्चू कडु यांना ‘मातृशोक’, फेसबुक पोस्ट करत व्यक्त केल्या भावना, म्हणाले..
माझ्या ऑफीसमध्ये एक घड्याळ होतं त्यात कॅमेरा लावला होता’, प्रवीण चव्हाण यांचा गौप्यस्फोट
माझ्या ऑफीसमध्ये एक घड्याळ होतं त्यात कॅमेरा लावला होता’, प्रवीण चव्हाण यांचा गौप्यस्फोट

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now