जम्मु काश्मीरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लेहमध्ये सुरु असलेल्या एका ऑपरेशन दरम्यान साताऱ्याच्या जवानाला वीरमरण आले आहे. लष्कराचं ऑपरेशन रक्षक सुरु असताना जवान सुरज शेळके हा जवान शहीद झाला आहे. (satara soldier suraj shelke death)
सुरज साताऱ्यातील खटाव गावचे सुपूत्र असून त्यांच्या जाण्याने खटावसह संपूर्ण परीसरात शोककळा पसरली आहे. तीनच वर्षांपूर्वी सुरज शेळके यांनी आर्मी जॉईन केली होती. ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांचे पहिलेच पोस्टिंग लेह लडाखला झाले होते. तेव्हापासून ते तिथेच सेवा बजावत होते.
लेहमध्ये लष्काराचे एक ऑपरेशन सुरु होते. त्या ऑपरेशनमध्ये सुरज यांचाही सहभाग होता. या ऑपरेशन दरम्यान सुरज हे शहीद झाले आहे. सुरज शेळके हे फक्त २३ वर्षांचे होते. त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबात आई, वडील आणि छोटा भाऊ असा त्यांचा परीवार आहे.
सातारा जिल्ह्याला सैनिकांची परंपरा आहे. तसेच या जिल्ह्याला सैनिकांचे गाव असेही म्हटले जाते. या जिल्ह्यातील अनेक तरुण सैन्यामध्ये जाऊन देशसेवा करत असतात. या जिल्ह्यातील अनेक वीरांनी देशासाठी बलिदान दिले आहे. साताऱ्यातील खटाव तालुक्यातील अनेक तरुण आर्मीमध्ये आहेत.
या एका महिन्याच्या काळात खटावमधील तीन जवानांना वीरमरण आले आहे. गेल्या महिन्यात लडाख प्रदेशात २५ सैनिकांना घेऊन जाणारे लष्कराचे वाहन नदीत पडले होते. या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये साताऱ्याचे सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांना वीरमरण आले होते.
तसेच या महिन्याच्या सुरुवातीला ११ जून रोजी खटाव तालुक्यातील भुरकवडीचे सुपुत्र जवान संग्राम फडतरे जम्मू काश्मीरच्या लेहमध्ये शहीद झाले होते. त्यामुळे गेल्या एका महिन्यात साताऱ्यातील तीन जवान शहीद झाले आहे. या जवानांच्या वीरमरणामुळे संपूर्ण साताऱ्यात शोककळा पसरली आहे.
महत्वाच्या बातम्या-
मातोश्रीवर ठाकरेंसोबत चर्चा सुरू असतानाच शिवसेना नेत्याला आला शिंदेंचा फोन; वाचा पुढे काय घडलं..
लवकरच पडद्यावर झळकणार ‘बाबू भैया’, हेरा फेरी ३ च्या निर्मात्यांची मोठी घोषणा, चाहते झाले खुश
‘गद्दारांना ठोका! ठाकरे ब्रँड वाचवा!’ अडचणीतील शिवसेनेच्या मदतीसाठी मनसेही उतरली मैदानात