ठाकरे सरकारने सुपरमार्केटमध्ये आणि किराणा दुकानात वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वस्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. अनेकजण आक्रमकही झाले आहे. अशात किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. (satara police arrested bandatatya)
ठाकरे सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत बोलताना, त्यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. पण त्यांनी केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच महागात पडल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर सर्व पक्षातील महिला नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आता राज्य महिला आयोगाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. महिलांबाबतची अशी वक्तव्य खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा महिला आयोगाकडून देण्यात आला होता. तसेच सातारा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करुन यासंदर्भातला अहवाल दोन दिवसात सादर करावा, असा आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.
रुपाली चाकणकरांच्या आदेशानुसार शुक्रवारी सकाळी बंडातात्या कराडकर यांच्या मठात साताऱ्याचे पोलिस पोहचल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता पोलिस बंडातात्यांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सध्या पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरु असून न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आले आहे.
दरम्यान, शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्यानंतर तीव्र आक्षेप नोंदवला होता. स्वत:ला किर्तनकार म्हणवतात, पण स्त्रीत्वाचे असे धिंडवडे काढतात. स्त्रियांचा जाहीररित्या अपमान खपवून घेतला जाणार नाही. बंडातात्यांनी जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी मनिषा कायंदे यांनी केले होती.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रुपाली पाटील ठोंबरे याही बंडातात्यावर आक्रमक झाल्या आहे. त्यांनी बंडातात्यावर टीका केली आहे. तसेच बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितलीच पाहिजे, अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
महत्वाच्या बातम्या-
बंडातात्या किर्तनकार आहे की नाही हाच प्रश्न; सुप्रियाताईंना दारूडी म्हटल्यामुळे राष्ट्रवादी संतापली
अजित पवारांनी पुरवला चोपदाराच्या लेकीचा हट्ट; वाचा नेमकं काय घडलं…
आमिर खान किरण राव पुन्हा येणार एकत्र? दोघांचा एकमेकांना मिठी मारतानाचा व्हिडीओ व्हायरल