पुणे येथील सासवडमधील दुहेरी हत्याकांड घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरल आहे. ताथेवाडी (ता. पुरंदर) येथील एका अंडाभुर्जी विक्रेत्याने मारहाण करून अंगावर उकळते पाणी ओतून दोन जणांचा खून केल्याची घटना सासवड येथे घडली. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तर या घटनेवरून राजकारण देखील तापले आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत थेट आमदार संजय जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. सासवड येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणामुळे विजय शिवतारे आणि संजय जगताप आमनेसामने आले आहेत.
पत्रकार परिषद घेत विजय शिवतारे म्हणाले, ‘सासवड येथील दुहेरी हत्याकांड प्रकरण पोलिसांवर दबाव आणून संजय जगताप यांनी दडपले होते, मात्र कर्तबगार पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख आणि हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या तत्परतेने दोन्ही हत्या प्रकरणाला वाचा फुटली, असे दावा शिवतारे यांनी केला.
ते याबाबत पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना शिवतारे म्हणाले, ‘तालुक्याची स्थिती भीषण झालेली असून गरिबांना वाली उरलेला नाही. सासवडचा बिहार झाला असून या दुहेरी हत्याकांड प्रकरणात आमदार, त्यांचा एक सहकारी, सासवडचे काही पोलीस आणि ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर्स यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासायला हवेत, तेव्हाच हत्याकांडाचा शोध लागेल.’
दरम्यान, प्रसिद्धीपत्रक काढून संजय जगताप यांनी शिवतारे यांनी केलेले सर्व आरोप खोडून काढले आहेत. ‘माजी आमदारांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत. या घटनेशी अथवा ती दडपण्यात माझा आणि माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याचा संबंध नसल्याच त्यांनी म्हंटलं आहे.
पुढे ते म्हणाले, ‘सासवड येथे दोन कचरावेचकांचा हातगाडीवाल्याच्या मारहाणीत झालेला मृत्यू ही घटना अतिशय निंदनीय आहे. पोलीस प्रशासनाने आरोपीला अटक केली असून, त्याला कायद्यानुसार शिक्षा होईल,’ असं प्रसिद्धीपत्रक काढून संजय जगताप यांनी म्हंटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पुण्यातील व्हाईट हाऊस ईडीच्या ताब्यात; अभिनेत्री अँजेलिना जोलीने देखील केले होते यामध्ये शूटिंग
‘आता काश्मीर सोडल्याशिवाय पर्याय नाही’; कश्मीरी हिंदूंनी केली सामूहिक पलायनाची घोषणा
अखेर केकेच्या मृत्यूचे खरे कारण समोर आलेच; वाचून तुम्हालाही बसेल धक्का
फक्त मॅगी, सेक्सची जास्त मागणी, डोक्यावर केस नाहीत, भारतात घटस्फोटाची धक्कादायक प्रकरणे