सध्या पंढरपुराला जाणाऱ्या वारीची सर्वत्र चर्चा आहे. पण या वारीतून अनेक धक्कादायक घटनाही समोर येत आहे. आता अशीच एक घटना समोर आली आहे. संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील रथाला जुंपणाऱ्या सर्जा आणि राजा या बैलजोडीपैकी सर्जाने आपले प्राण सोडले आहे. (sarja bull death in palkhi)
सर्जा या बैलाने आपला प्रवास अर्ध्यावरच सोडत आपली जीव सोडला आहे. त्यामुळे त्याचे पांडुरंगाचे दर्शन अपूर्णच राहिले आहे. गेल्या दहावर्षांपासून सर्जा सोपानकाकांचा पालखी रथ ओढत होता. मात्र यावर्षी त्याचे दर्शन अर्धवटच राहिले आहे.
बारामतीतील सोरटेवाडी येथील केंजळे कुटुंबियांना गेल्या १०० वर्षांपासून संत सोपानकाका पालखी सोहळ्याचा रथ ओढणाऱ्या बैलांचा मान आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सोरटेवाडीच्या केंजळे वाड्यातून प्रसाद केंजळे, विकास केंजळे, नितीन केंजळे, नितीन कुलकर्णी, ज्ञानेश्वर केंजळे यांनी बैलांचे पुजन केले होते.
त्यांनी सर्जा आणि राजाला सासवडला पाठवले होते. सासवड येथून हा पालखी सोहळा सुरु झाल्यापासून कोऱ्हाळे मुक्काम उरकल्यानंतर सर्जा आजारी पडला होता. तरीही त्याने बारामतीमध्ये पालखी रथ ओढला होता. त्याच्यावर दवाखान्यात सुद्धा उपचार करण्यात आले पण फरक पडला नाही.
त्यानंतर उपचारादरम्यानच सर्जाने आपले प्राण सोडले आहे. पालखी अर्ध्या रस्त्यात असतानाच त्याने आपले प्राण सोडल्यामुळे त्याचे दर्शन अर्धवट राहिले आहे. गेल्या दहा वर्षांपासून सर्जा पालखीच्या रथाला खांदा देत होता. पण यंदा मात्र त्याची विठ्ठलाची ओढ अपूर्णच राहिली आहे.
सर्जाने निम्मावर साथ सोडण्याआधीच तो आजारी पडला होता. पण त्यानंतर देखील तो पालखीला खांदा देत होता. पालखी अर्ध्यात थांबू नये, त्यासाठी केंजळे कुटुंबियाने नवीन बैल खरेदी केला होता. त्यानंतर नवीन बैलाने खांदा दिला आणि हा सोहळा तसाच सुरु ठेवण्यात आला आहे, अशी माहिती विकास केंजळे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्री न बनवल्यामुळे देवेंद्र फडणवीस अजूनही नाराज? बॅनरवरून शहांचा फोटो वगळला
रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडिजचा स्पीड फिका पडला आहे, कारण…; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
अजित पवारांच्या ‘त्या’ व्हिडिओवर निलेश राणेंची हैराण करणारी प्रतिक्रिया; म्हणाले, आता आम्ही तुमच्या पाया सुद्धा पडू