Share

मुंबईच्या खेळाडूने रणजीत घातला धुमाकूळ, आतापर्यंत झळकवली सात शतकं; रोहित-राहूल कधी घेणार दखल

रणजी ट्रॉफीच्या नॉकआऊट सामन्यांना सोमवारपासून म्हणजेच ६ जूनपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत मुंबईचा फलंदाज सर्फराज खाननेही असे काहीसे केले आहे. जे राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज फलंदाजांनाही त्यांच्या कारकिर्दीत जमले नाही. (sarfaraz khan century in ranji)

आयपीएलध्ये दुर्लक्षित केल्या गेलेल्या सर्फराजने रणजी ट्रॉफीत चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्याने उत्तराखंडविरुद्धच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दमदार शतक झळकावले आहे. गेल्या १३ डावांतील त्याचे हे सहावे शतक आहे.

सर्फराजने उत्तराखंडविरुद्ध २०५ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १५३ धावांची खेळी खेळली. या शतकासह तो रणजीच्या या सिजनमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे. एवढेच नाही तर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्फराजचे हे सातवे शतक आहे. तो रणजीमध्ये फॉर्ममध्ये असल्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहूल द्रविड निवडकर्त्यांकडे कधी त्याच्या नावाचा आग्रह करतील असा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे.

गेल्या पाच डावांमध्ये त्याने १५६ च्या सरासरीने ६२४ धावा केल्या आहेत. यासह सर्फराज असा खेळाडू फलंदाज बनला आहे, ज्याने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या सात शतकांमध्ये १५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.

सर्फराज खानने रणजी ट्रॉफीमध्ये गेल्या १३ डावांमध्ये सहा शतके झळकावली आहेत. यामध्ये एक तिहेरी शतक, ३ द्विशतके, पाचवेळा १५० हून अधिक धावा आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. सर्फराजने रणजी ट्रॉफी २०२२ मध्ये आतापर्यंत २७५, ६३, ४८, १६५ आणि १५३ अशा धावा केल्या आहेत.

सर्फराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण केल्या आहेत. तो सध्या ८०+ च्या सरासरीने धावा करत आहे. सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर सर्फराजच आहे ज्याची ही सर्वोत्तम सरासरी आहे. ब्रॅडमन यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९५.१४ च्या सरासरीने २००० धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या क्रमांकावर विजय मर्चंटने ७१.६४ आणि चौथ्या क्रमांकावर जॉर्ज हेडलीने ६९.८६ च्या सरासरीने २००० धावा पुर्ण केल्या आहे.

महत्वाच्या बातम्या-
काँग्रेसने दिली चड्ड्या जाळण्याची धमकी, RSS ने काँग्रेसला पाठवली अंतर्वस्त्रे, वाचा नेमका वाद काय?
OTT वर आहेत ‘या’ पाच सगळ्यात बोल्ड फिल्म्स, चुकूनही कोणासमोर पाहण्याची करू नका चूक
भारताच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या वडीलांना अटक; बॅंक आॅफ महाराष्ट्रमध्ये केला कोट्यावधींचा घोटाळा

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now