Share

सारा तेंडुलकर आणि शुबमन गिलचा लवकरच होणार साखरपुडा? सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल

सारा तेंडुलकर आणि शुबमन गिलचा लवकरच होणार साखरपुडा? सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल

सारा तेंडुलकरचा लवकरच होणार साखरपुडा? सचिन तेंडुलकरला मिळाला मनासारखा जावई?

भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत असते. अलीकडेच, शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात द्विशतक झळकावले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला.

https://twitter.com/nautankivale/status/1615663282932842496?s=20&t=yVXQRPHK6zgpQYy-6LJiCw

शुभमनने अवघ्या 152 चेंडूत द्विशतक ठोकून नवा विक्रम केला. यानंतर सचिन तेंडुलकरची मुलगी साराच्या एंगेजमेंटचे ट्विट व्हायरल होत आहे. पण ही निव्वळ अफवा आहे. सोशल मिडीयावर सारा आणि शुबमन गिल या दोघांच्या पोस्टचा पुर आला आहे. जेव्हापासून शुबमन गिलने द्विशतक ठोकले आहे तेव्हापासून नेटकरी शुबमन गिल आणि साराच्या नावाने पोस्ट करत आहेत. सध्या सारा आणि शुबमन ट्रेंडिगला आहेत.

दुसरीकडे शुभमन गिल सध्या सारा अली खानला डेट केल्यामुळे चर्चेत आहे. त्याचे नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिच्याशीही जोडले जाते आणि सारा अली खानशीही जोडले जाते. सामना सुरू असताना शुभमन गिल सीमारेषेजवळ मैदानात उतरला तेव्हा चाहते ‘सारा सारा’ असा जयघोष करत होते.

काही महिन्यांपूर्वी त्याने सोनम बाजवाला सांगितले की, तो सारा अली खानला डेट करत आहे, त्याने असेही सांगितले की ती इंडस्ट्रीतील सर्वात फिट अभिनेत्री आहे. या प्रकरणावर अभिनेत्रीने मौन बाळगले आहे. दोघे अनेकदा रेस्टॉरंटमध्ये सोबत दिसले आहेत.

अलीकडे सारा सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. इंस्टाग्राम आणि ट्विटरवर मिम्स व्हायरल होत आहेत. त्यामुळे नेमकं शुबमन कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे हे सांगणे कठीण आहे. सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिच्याशी त्याचे नाव आधीपासून जोडले गेले आहे.

दरम्यान, न्युझीलंडविरूद्ध सामना जिंकल्यानंतर सामनावीर शुबमन गिल म्हणाला की, मी मैदानात उतरण्याची आणि मला जे करायचे आहे ते करण्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. ‘विकेट पडल्यामुळे, मला बराच वेळ मोकळेपणाने खेळायचे होते आणि शेवटी मी ते करू शकलो याचा मला आनंद आहे. काहीवेळा जेव्हा गोलंदाज फॉर्ममध्ये असतो, तेव्हा तुम्हाला त्याचे दडपण जाणवायला हवे.

मला डॉट बॉल टाळणे आणि माझ्या हेतूने फलंदाजी करणे महत्वाचे होते. मी 200 धावांचा विचार करत नव्हतो, पण एकदा मी 47 व्या षटकात षटकार मारला तेव्हा मला जाणवले की मी हे करू शकतो. त्याआधी मी चेंडूला बघून खेळत होतो. ईशान किशन हा माझा चांगला मित्र आहे.

जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट करायची असते तेव्हा छान वाटते आणि ती गोष्ट नियमितपणे होत असते. शुभमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 19 डाव घेतले. 18 डावात सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करून पाकिस्तानचा फलंदाज फखर जमान अव्वल स्थानावर आहे.

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now