राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर अखेर सोमवारी खासदार संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेतले आहे. तीन दिवसांनंतर अखेर त्यांनी उपोषण मागे घेतले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि सांस्कृतीक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन मागण्या पुर्ण केल्याची लेखी ग्वाही दिली आहे. (sanyogita raje on sambhajiraje)
त्यानंतर मराठा समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मागण्या पुर्ण झाल्यानंतर मैदानात एकच जल्लोष पाहायला मिळाला. खासदार संभाजीराजे छत्रपती गेल्या तीन दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते.
मराठा क्रांती ठोक मोर्चानेही संभाजी छत्रपती यांना पाठिंबा दिला होता. संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात जमले होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी संभाजीराजेंची तब्येत बिघडली होती. त्यांची शुगर कमी होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.
आता या उपोषणानंतर संभाजीराजे यांनी आणि त्यांची पत्नी संयोगिता राजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्यही केले आहे. यावेळी संयोगिता यांनी सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या आणि संभाजीराजेंच उपोषण संपलं, तर आपण मंदिरात चालत येईल, असं आपण सिद्धीविनायकाला साकडं घातलं होतं, असे म्हटले आहे.
संभाजीराजे २००९ साली जेव्हा पराभूत झाले होते, तेव्हापासून मी नवस मागणं सोडून दिलं होतं. पण ३ दिवसांपासून ते उपोषण करत होते. त्यामुळे त्यांच्या मागण्यापूर्ण होण्यासाठी मी सिद्धीविनायकाकडे साकडं घातलं होतं, असे संयोगिता राजे यांनी म्हटले आहे.
मी बाप्पाला नवस बोलले होते की मागण्या पूर्ण झाल्या तर मी आझाद मैदानापासून मंदिरापर्यंत चालत येईल. शेवटी मागण्या पूर्ण झाल्या आणि मी इथे मंदिरात आले आहे, यावेळी राजेही माझ्यासोबत आले आहे, असेही संयोगिता यांनी म्हटले आहे. संयोगिता यांची इच्छा पूर्ण झाल्यामुळे ते नवस फेडण्यासाठी मंदिरात आल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या-
भारतावर खुश असलेला रशिया आता भारतीय मिडीयावर झाला नाराज, दिल्या ‘या’ महत्वाच्या सुचना
दारूच्या नशेत असतानाचा विनोद कांबळीचा व्हिडीओ झाला व्हायरल, इमारतीच्या गेटवर धडकवली गाडी
राग, जिद्द आणि चिकाटी असलेले अशनीर ग्रोव्हर यांची त्यांच्याच कंपनीने केली हकालपट्टी; कारण वाचून हादराल